जालन्यात पाण्यासाठी रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 00:41 IST2019-05-18T00:41:07+5:302019-05-18T00:41:36+5:30
शहरातील कचेरी रोड परिसरातील रोहिलगल्ली शनिमंदीर परिसरात मागील पंचवीस दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संतप्त नागरिकनी शुक्रवारी सायंकाळी शनिमंदीर परिसरात रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली.

जालन्यात पाण्यासाठी रास्तारोको
जालना : शहरातील कचेरी रोड परिसरातील रोहिलगल्ली शनिमंदीर परिसरात मागील पंचवीस दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने संतप्त नागरिकनी शुक्रवारी सायंकाळी शनिमंदीर परिसरात रास्तारोको आंदोलन करुन पाणी देण्याची मागणी केली.
जायकवाडी धरणातून ९० कि़मी अंतर्गत जलवाहिनी टाकून अंबड मार्ग नगरपालिकने शहरात पाणी आणले आहे. त्यातच अंबड परिसरात अंतर्गत जलवाहिनी फोडून शहराच्या हक्काच्या पाण्याची चोरी करण्यात येत आहे. तसेच जलवाहिनेचे व्हॉल्ह अनेक ठिकाणी फुटत असल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. यामुळे शहराला पुरेशा पाणी पुरवठा होत नाही. शहरताील रोहिलागल्ली, शनिमंदीर पसिरात पंचवीस दिवसापासून नळाला पाणीच आले नाही.
यामुळे भुर्दड सहन करुन विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. सध्या रमजानचा महिना असल्याने पाण्याविना मुस्लिम बांधवाची गैरसोय होत आहे.
कारवाईची मागणी
नगरपालिकेच्या अंतर्गत जलवाहिनचे नुकसान करणाऱ्याविरुध्द पालिकने सक्तीची कारवाई करावी,तसेच शहरातील विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत करुन नागरिकांना दिलासा द्यावा आदी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.