शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पारध ते पिंपळगाव रेणुकाई रस्ता असून अडचणी, नसून खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:55 IST

रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे का ? पारध : पारध ते पिंपळगाव रेणुकाई रस्त्याचे काम महिन्याभरापूर्वीच लाखो रुपये खर्चून पूर्ण ...

रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे का ?

पारध : पारध ते पिंपळगाव रेणुकाई रस्त्याचे काम महिन्याभरापूर्वीच लाखो रुपये खर्चून पूर्ण करण्यात आले; परंतु हे निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे रस्ता असून अडचण, नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.

अनेक वर्षांपासून पारध ते पिंपळगाव रेणुकाई या पाच किलोमीटर रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. या रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडलेले होते. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे अशी अवस्था झाली होती. या रस्त्याचे तातडीने काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटनांनी केली होती. आमदार संतोष दानवे यांनी दखल घेऊन रस्त्याच्या कामासाठी लाखो रुपयांचा निधी खेचून आणला. रस्त्याचे कामही पूर्ण झाले; परंतु संबंधित कंत्राटदाराने गिट्टी टाकून थोडे डांबर टाकले. त्यावर बारीक गिट्टीचा थर टाकण्यात आला. मात्र, त्यानंतर डांबर टाकण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्यावर खड्डे पडत आहेत. शिवाय, बारीक गिट्टीमुळे दुचाकी घसरून पडत आहे. दुसरीकडे रायघोळ नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यावर मोठे चर पडले आहे. यामुळे नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

त्या रस्त्याचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले

पारध ते वालसावंगी रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र, हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. जोपर्यंत हे काम योग्य रीतीने होत नाही, तोपर्यंत काम सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत पारध येथील ग्रामस्थांनी रस्त्याचे काम बंद पाडले.

फोटो ओळी :

पारध -पिपंळगाव रेणुकाई रस्त्याच्या कामादरम्यान अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी रस्त्यावर असे चर पाडून ठेवले आहे. २) पारध ते पिपंळगाव रेणुकाई रस्त्यावर अशा प्रकारे बारीक गिट्टी टाकून काम उरकण्यात आले.