रिव्हॉल्वरसह दीड लाखांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:41 IST2018-09-12T00:40:55+5:302018-09-12T00:41:18+5:30
रेल्वे स्थानक भागातील रहिवासी गणेश भवर यांचे मंगळवारी भरदिवसा घर फोडून कपाटातून रिव्हॉल्वर आणि आठ तोळे सोने, एक लाख ६० हजार रूपये रोख रक्कम लांबविले

रिव्हॉल्वरसह दीड लाखांचा ऐवज लंपास
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : रेल्वे स्थानक भागातील रहिवासी गणेश भवर यांचे मंगळवारी भरदिवसा घर फोडून कपाटातून रिव्हॉल्वर आणि आठ तोळे सोने, एक लाख ६० हजार रूपये रोख रक्कम लांबविले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
जालना येथील माजी मंत्री तथा आ. राजेश टोपे यांच्या स्वीय सहायक गणेश भवर हे मंगळवारी नेहमीप्रमाणे भाग्यनगरमधील टोपे यांच्या निवासस्थानी कामावर गेले होते. त्यांच्या पत्नी शिक्षिका असल्याने त्याही शाळेमध्ये गेल्या होत्या. दुपारी १२ ते २ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी भवर यांचे सोनल नगर मधील घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातून ०.३२ व्यासाचे रिव्हॉल्वर आणि सहा काडतुसांसह आठ तोळे सोन्याचे दागिने आणि एक लाख ६० हजार रूपयांची रोख रक्कम लांबविली.