परतूर येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:17+5:302021-07-07T04:37:17+5:30
या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा विमलताई जेथलिया, संस्थेच्या ...

परतूर येथे रक्तदान शिबिरास प्रतिसाद
या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा विमलताई जेथलिया, संस्थेच्या अध्यक्षा आशाबाई आकात, पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, लायन्स क्लबचे मनोहर खालापुरे, प्राचार्य डॉ. भारत खंदारे, उपप्राचार्य डॉ. सुधाकर जाधव, डॉ. रवी प्रधान, संभाजी तिडके, नगरसेवक कृष्णा आरगडे, दिलीप मगर हे होते. राज्यातील वाढता रक्ताचा तुटवडा लक्षात घेता ‘लोकमत’ वृत्तसमूहाने या शिबिराचे आयोजन केले होते.
चौकट.
यावेळी उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव म्हणाले की, अशी शिबिरे मोठया प्रमाणात आयोजित करणे गरजेचे आहे. ‘लोकमत’ने अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. यात सर्वांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचेही यावेळी जाधव यांनी सांगितले.
नगराध्यक्षा जेथलिया
या प्रसंगी विमलताई जेथलिया म्हणाल्या की, रक्तदान हे इतर दानांपेक्षा श्रेष्ठ दान आहे. आपल्या या दानातून कोणाला तरी जीवदान मिळू शकते. त्यामुळे सर्वांनी या शिबिरात सहभागी व्हावे, असेही शेवटी नगराध्यक्षा जेथलिया यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक कौठाळे, प्राचार्य खंदारे, यांनी विचार मांडले.
चौकट
या रक्तदान शिबिरात महिलांनीही सहभाग नोंदवला. रेखा संजय जाधव, राधा कचरू घोडके, मीरा राजेंद्र उढाण या महिलांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आपला सहभाग नोंदविला.
चौकट.
रांगोळीने लक्ष वेधले.
या शिबिरात दीपक दीक्षित यांनी अत्यंत सुरेख काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
या कार्यक्रमास प्रा. यशवंत दुबाले, प्रबंधक दशरथ देवडे, नामदेव वायाळ, प्रा. राजेंद्र उढाण, प्रा. राघो गायकवाड, प्रा. संदीप रिंढे, प्रा. संतोष अंभुरे, प्रा. प्रशांत झरेकर, प्रा. सुरेश खरात, प्रा. धनंजय जागृत, प्रभाकर सुरुंग, मुख्याध्यापक विष्णुपंत तोटे, पतंगे, नरवडे, डुकरे, आदींनी सहकार्य केले.