जालन्यात जिवंत काडतुसासह गावठी पिस्तुल बाळगणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 04:43 PM2019-06-18T16:43:43+5:302019-06-18T16:55:55+5:30

दीड ते दोन वर्षांपासून मी एक गावठी पिस्टल व जिंवत काडतूसे संतोष जोगदंड (रा. बीड) यांच्याकडून विकत घेतली असून, ती सध्या घरी असल्याचे सांगितले. 

A resident arresred who lives in Jalna with a live cartridge and gun | जालन्यात जिवंत काडतुसासह गावठी पिस्तुल बाळगणारा अटकेत

जालन्यात जिवंत काडतुसासह गावठी पिस्तुल बाळगणारा अटकेत

Next

जालना :  जिवंत काडतुसासह गावठी पिस्तुल बाळगणाºया गुन्हेगारास एडीएसच्या पथकाने मंगळवारी अटक केली.  रामदास गणपत बरडे (२५. रा. जालोरा ता. अंबड) असे आरोपीचे नाव आहे. 

एडीएसचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांना खबºयामार्फेत माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील गुन्हेगार रामदास बरडे हा काही दिवसापासून गावठी पिस्टल व जिंवत काडतूसासह वापरत असून तो सध्या अंबड चौफुली येथे आला आहे.  या माहितीवरुन सदर ठिकाणी पथक पाठवले असता, यशवंती ढाब्यासमोर एक इसम दिसल्याने त्यास परिचय देवून त्याची विचारपूस केली. मिळालेल्या माहितीच्या अनूषंगाने त्यास गावठी पिस्टल बाबत चौकशी केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे देवून वेळकाढुपणा केला. त्यास अधिक विश्वासात घेवून विचारपूस केली असता, त्याने गावठी पिस्टल असल्याची कूबली दिली. त्याने सांगितले की, दीड ते दोन वर्षांपासून मी एक गावठी पिस्टल व जिंवत काडतूसे संतोष जोगदंड (रा. बीड) यांच्याकडून विकत घेतली असून, ती सध्या घरी असल्याचे सांगितले. 

त्यानंतर त्याच्या घरी जावून पंचासमक्ष एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस व एक अर्धवट असलेला काडतूस असा ४०२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.  याप्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, कर्मचारी ज्ञानदेव नागरे, नंदू खंदारे, किरण चव्हाण, धनाजी कावळे, गजू भोसले, सचिन आर्य यांनी केली.

Web Title: A resident arresred who lives in Jalna with a live cartridge and gun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.