जिल्ह्यात २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:27 IST2021-02-08T04:27:23+5:302021-02-08T04:27:23+5:30

जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा रविवारी मृत्यू झाला, तर रविवारीच २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ...

Report of 29 people in the district is positive | जिल्ह्यात २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एकाचा रविवारी मृत्यू झाला, तर रविवारीच २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यशस्वी उपचारानंतर २६ जणांना घरी सोडण्यात आले. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ८८० वर गेली असून, आजवर ३७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १३ हजार ३५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जालना शहरातील १२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मंठा शहरातील दोघांना कोरोनाची लागण झाली. घनसावंगी तालुक्यातील कोरडगाव येथील एक, तर अंबड शहरातील १, तालुक्यातील ताड हादगाव येथील एकास कोरोनाची बाधा झाली. बदनापूर शहरातील २, तर जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी १, सिपोरा येथील एकास कोरोनाची लागण झाली. भोकरदन शहरातील एक, तर तालुक्यातील राजूर येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. बुलडाणा जिल्ह्यातील ५, तर उत्तर प्रदेश येथील एकास कोरोनाची लागण झाली. जिल्ह्यात २० हजार ८१ जण संशयित आहेत. रविवारी ६८४ लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २९ जणांचा आवाहन पॉझिटिव्ह आला.

Web Title: Report of 29 people in the district is positive