मंठ्यात लाल बावटाचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 00:26 IST2019-08-23T00:25:07+5:302019-08-23T00:26:40+5:30
पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त जनतेला हक्काचे घरकुल देण्यात यावे, स्वस्त धान्य दुकानांवर दोन रूपये किलो प्रमाणे ३५ किलो धान्य देण्यात यावे, यासह अनेक मागण्यांसाठी लालबावटा युनियनतर्फे गुरूवारी येथील तहसील कार्यालासमोर आंदोलन करण्यात आले.

मंठ्यात लाल बावटाचे आंदोलन
मंठा : पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त जनतेला हक्काचे घरकुल देण्यात यावे, स्वस्त धान्य दुकानांवर दोन रूपये किलो प्रमाणे ३५ किलो धान्य देण्यात यावे, यासह अनेक मागण्यांसाठी लालबावटा युनियनतर्फे गुरूवारी येथील तहसील कार्यालासमोर आंदोलन करण्यात आले.
दरम्यान तहसीलदार सुमन मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मागण्या कळवून सोडविल्या जातील, असे आश्वासन देताच आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले. राज्यात एकीकडे भयानक पूर परिस्थिती असताना दुसरीकडे भीषण दुष्काळ पडला आहे. यामुळे मजुरांना हाताला काम राहिले नाही. खायला धान्य मिळत नाही. सरकार फक्त पोकळ आश्वासन देत राजकारण करीत आहे.
जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. असे एक ना अनेक आरोप आंदोलनकर्त्यांनी शासनावर केले.
आंदोलनाचे नेतृत्व राज्य शेतमजूर युनियनचे (लालबावटा) राज्याध्यक्ष कॉ. मारोती खंदारे, जिल्हासचिव कॉ. सरिता शर्मा, जिल्हा सहसचिव सचिन थोरात जिल्हा अध्यक्ष नंदकिशोर प्रधान, कालिंदा प्रधान यांनी केले.
या प्रसंगी बंडोपंत कणसे, दीपक दवंडे, श्रावण शिंदे, रंगनाथ तांगडे, शेषकला थटवले, सुवर्णा चाळक, मैनाजी पितळे, कलावती भोंगाळ, शकिला शेख आदींची उपस्थिती होती.