शहरं
Join us  
Trending Stories
1
'गजा मारणेची पार्श्वभूमी माहीत नव्हती, आमची झालेली भेट केवळ अपघात'; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण
2
अजित पवारांच्या विरोधातील मोहीम कुणाच्या इशाऱ्यावर? अण्णा हजारेंच्या भूमिकेवर NCPचा पलटवार
3
“शाहगड येथे कार्यालय सुरू करणार, आंदोलन सोडणार नाही”; मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार
4
सुनेत्रा पवार यांचा फॉर्म भरताना शिंदे-फडणवीस का नव्हते? अजित दादांनी स्पष्टच सांगितले
5
“संजय राऊतांनी शिवसेनेचे दोन तुकडे करुन दाखवले, राज ठाकरेंवर बोलू नये”; मनसे नेत्यांचा पलटवार
6
RSSच्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका; अजित पवारांचे थेट शब्दांत भाष्य, म्हणाले...
7
'सुनिताला परवानगी देण्यात यावी...', केजरीवाल यांची न्यायालयाकडे नवी विनंती; अर्ज करत केल्या दोन मागण्या
8
अमेरिकन रॅपर ड्रेक मालामाल! भारत-पाक वर्ल्ड कप सामन्यात सट्टात जिंकले ७ कोटी!!
9
शशांक केतकरच्या तक्रारीनंतर BMC ची तातडीने कारवाई, स्वच्छ केला परिसर; अभिनेता म्हणाला...
10
Human finger in ice cream in Mumbai: ज्या कंपनीच्या आईस्क्रिम कोनमध्ये सापडलं मानवी बोट, ती कंपनी आता म्हणते, "आम्ही तर आता.."
11
Mandira Bedi : "ते माझं घर चालवायला येणार नाहीत, दुःख आहे जे...."; पतीच्या निधनावर पहिल्यांदा बोलली मंदिरा
12
तो लॅपटॉप सोबतच ठेवतो अन् मॅच संपल्यावर ऑफिस काम करतो! सौरभ नेत्रावळकरची कमिटमेंट
13
अयोध्येला जाणाऱ्यांची संख्या घटली, स्पाइसजेटनं विमान सेवा बंद केली!
14
Fact Check: शपथविधी सोहळ्यात गडकरींनी PM मोदींना अभिवादन केले नाही? पाहा, दाव्यामागचे सत्य
15
लय भारी! WhatsApp वर आलं Zoom सारखं फीचर; ३२ लोकांना करता येणार Video कॉल
16
Review: खऱ्या नायकाच्या संघर्षाची 'गोल्ड'न स्टोरी, वाचा कसा आहे कार्तिकचा 'चंदू चॅम्पियन'
17
Fact Check : राष्ट्रगीत सुरू होतं आणि पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसले?; जाणून घ्या 'सत्य'
18
गुरुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वृद्धी योग; वरदान काळ, तुमची रास कोणती?
19
तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना
20
Sushant Singh Death Anniversary : सुशांतच्या बहिणीने शेअर केला थ्रोबॅक व्हिडीओ; म्हणाली - 'हा राजकीय अजेंडा...'

दुष्काळावर मात करीत तुरीचे विक्रमी उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 1:05 AM

दुष्काळावर मात करीत पाण्याचे योग्य नियोजन करुन येथील शेतकरी राजू उध्दवराव बागल यांनी तीन वर्षात तुरीचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : दुष्काळावर मात करीत पाण्याचे योग्य नियोजन करुन येथील शेतकरी राजू उध्दवराव बागल यांनी तीन वर्षात तुरीचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत. यंदा दुष्काळी परिस्थिती असतांना सुध्दा तुरीचे योग्य संगोपन केल्याने त्यांच्या शेतातील तुरीचे पीक चांगलेच बहरले आहे. यामुळे त्यांची तूर बघण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतात पाहणीसाठी येत आहेत. बागल यांनी तुरीचे विक्रमी उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.शेती हा व्यवसाय दिवसेंदिवस फसत चालला आहे. नवनवीन प्रयोग करूनही दरवर्षी उत्पन्न मिळेलच याची शास्वती नाही, कधी कधी तर पेरणीचा खर्चही निघणे अवघड होत आहे. बदलत्या हवामानात नेमके कोणते पीक घ्यावे, हे शेतकºयांना कळेना, कारण कोणतेही पीक घेतले तरी, पाउस व बदलते हवामान यामुळे पीक पेरणी व लागवडीचा ताळमेळ बसेनासा झाला आहे. मागील दोन तीन वर्षापासून तर शेतक-यांना  मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यावर्षी तर चक्क दुष्काळाचाच सामना करायचा आहे. अशा परिस्थितीत काही शेतकरी उमेद न हरता हाडाची काडे करून विक्रमी उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात, असेच परतूर शहरातील राजू उध्दवराव बागल हे शेतकरी मागील तीन वर्षापासून सातत्याने तुरीचे विक्रमी उत्पन्न घेत आहेत. यातील विशेष म्हणजे या तुरीच्या पिकासाठी बागल हे कुठल्याही रासायनिक खते, अ‍ेोषधीचा वापर करत नाहीत. यामुळे तूर कीडमुक्त दिसून येत आहे.

टॅग्स :droughtदुष्काळpigeonsकबुतरagricultureशेती