लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ वडीगोद्री येथे रस्तारोको; धुळे-सोलापूर महामार्ग ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 15:19 IST2024-10-01T15:19:16+5:302024-10-01T15:19:46+5:30

ओबीसी बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर टायर जाळून केला निषेध व्यक्त 

Rastraroko at Wadigodri to protest attack on Laxman Hake; Dhule-Solapur highway blocked | लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ वडीगोद्री येथे रस्तारोको; धुळे-सोलापूर महामार्ग ठप्प

लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ वडीगोद्री येथे रस्तारोको; धुळे-सोलापूर महामार्ग ठप्प

- पवन पवार 
वडीगोद्री ( जालना) :
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके  यांच्यावर सोमवारी रात्री पुणे येथे झालेला हल्ला आणि बिनबुडाचा आरोप याच्या निषेधार्थ वडीगोद्री येथे ओबीसी समाज बांधवांनी आज दुपारी रस्तारोको आंदोलन करण्यात आले. धुळे ते सोलापूर महामार्गावर टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आल्याने वाहतूक ठप्प झाली. 

यावेळी आंदोलकांनी टायर जाळून महामार्ग रोखून धरला, काही आंदोलकांनी रस्त्यावर काटे टाकून जोरदार घोषणाबाजी केली. धुळे ते सोलापूर महामार्गावर ओबीसी आंदोलकांनी दीडतास रास्तारोको आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत पुणे येथील घटनेतील आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालेला असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी रास्तारोको मागे घेतला. मात्र, या रस्तारोकोमुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

Web Title: Rastraroko at Wadigodri to protest attack on Laxman Hake; Dhule-Solapur highway blocked