शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

तीनशे हेक्टरवरील रब्बी पीक बहरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:36 IST

वरूड (बु.) : गत अनेक वर्षांपासून ज्वारी पिकाकडे पाठ फिरविणाऱ्या वरूड (बु.) परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा जवळपास तीनशे हेक्टरवर ज्वारीची ...

वरूड (बु.) : गत अनेक वर्षांपासून ज्वारी पिकाकडे पाठ फिरविणाऱ्या वरूड (बु.) परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा जवळपास तीनशे हेक्टरवर ज्वारीची पेरणी केली आहे. गतवर्षी मुबलक प्रमाणात पडलेल्या पावसामुळे या भागातील रब्बी ज्वारी सध्या बहरली आहे. परंतु, महावितरणने थकीत वीज बिलामुळे अचानक वीज ताेडणी मोहीम हाती घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांनी फरदड घेणे टाळून रब्बीत इतर पिकांचा पर्याय शोधण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे रब्बीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जोरदार पाऊस झाल्याने सर्वत्र मुबलक पाणी आहे. पावसाने खरिपात नुकसान केले असले तरी शेतकऱ्यांची भिस्त आता रब्बीवर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा सुरूवातीपासून रब्बी पेरणीसाठी कंबर कसून उपलब्ध पाण्याचा कसा पुरेपूर फायदा घेता येईल. या पद्धतीने रब्बी पेरणीचे नियोजन केले होते. यामध्ये गहू, हरभरा, मका, ज्वारी, करडई आदी पिकाची जवळजवळ सातशे ते आठशे हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. पिकांना मुबलक पाणी असल्याने पिके देखील जोमात आहेत. मागील अनेक वर्षापासून शेतकरी ज्वारी पिकाकडे पाठ फिरवत होते. त्यामुळे या भागात ज्वारी मिळणे देखील दुरापास्त झाले होते. शिवाय ज्वारी विकत घ्यायची झाल्यास अधिक पैसे देऊन ज्वारी आयात करावी लागत असते. शेतकरी रब्बीत गहू व मकाचा पेरा वाढवीत असतो. यंदा मात्र गव्हाचे व मकाचे उत्पादन कमी करुन शेतकऱ्यांनी ज्वारी व हरभरा पिकाचा पेरा वाढविला आहे. वरूड व परिसरात ज्वारीचे पीक चांगलेच बहरले असून हे पीक कणसात आले आहे. काही ठिकाणी गहू, हरभरा सोंगणी सुरू आहे.

कोट

यावर्षी पर्जन्यमान चांगले होते. त्यामुळे कपाशी उपटून खाली झालेल्या शेतात एक एकर ज्वारीचे पिकाची पेरणी केली. सध्या ज्वारीचे पीक जोमात असून, रब्बीत इतर पिकाच्या तुलनेत ज्वारीचे पीक घेणे सोपे वाटत आहे.

विष्णू बावस्कर

शेतकरी वरूड (बु.)