शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
3
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
4
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
5
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
6
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
7
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
8
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
9
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
10
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
12
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
13
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
14
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
15
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
16
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
17
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
18
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
19
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच केजरीवाल यांना अटक का? सर्वोच्च न्यायालयाची ईडीला विचारणा; म्हणाले...
20
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 

जालना जिल्ह्यातून ५८ लाख रूपयांची कोष खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 1:05 AM

कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या रेशीमकोष खरेदी बाजारपेठेत सव्वा महिन्यात ५० क्विंटल रेशीम कोषाची खरेदी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेल्या रेशीमकोष खरेदी बाजारपेठेत सव्वा महिन्यात ५० क्विंटल रेशीम कोषाची खरेदी करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे सध्या बाजारपेठेत कोषाची आवक थंडावली आहे.मराठवाड्यासह राज्यातील रेशीम विकासाला चालना मिळावी या उद्देशाने पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी पुढाकार घेत रेशीम कोष खरेदी केंद्र मराठवाड्यात व्हावे यासाठी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला. शासनाने जालना येथे रेशीम बाजारपेठ खरेदी केंद्राला मान्यता दिल्यावर २१ एप्रिल रोजी या केंद्राचे उदघाटन करण्यात आले. पूर्वी शेतकऱ्यांना रेशीमकोष विक्रीसाठी कर्नाटक राज्यातील रामनगरम् येथे जावे लागत होते. रेशीमकोष उत्पादन करणा-या शेतक-यांना फायदा व्हावा यासाठी बाजार समिती परिसरात रेशीमकोष बाजारपेठ सुरू करण्यात आल्याचे राज्यमंत्री खोतकर म्हणाले. बाजारपेठे सुरू होऊन सव्वा महिना झाला आहे. ३१ मे पर्यत ५८ लाख ६० हजार रूपयांचे ५० क्विंटल रेशीम कोषाची खरेदी करण्यात आली आहे. वाढत्या तापमानामुळे सध्या बाजारात रेशीमकोषाची आवक मंदावली आहे. जिल्ह्यात सुमारे ७ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर रेशीम शेती करण्यात येत आहे. कमी वेळात आणि कमी पाण्यात जास्त पैसे देणारे पिक असल्याने बहुतांश शेतक-यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत रेशीम शेतीस प्राधान्य देत आहेत.लवकरच : सिरसवाडीत रेशीमकोष केंद्रजिल्ह्यात तुती लागवडीचे प्रमाण वाढत आहे. ७ हजार हेक्टरपेंक्षा जास्त क्षेत्रावर रेशीमची शेती होत आहे. शेतक-यांची गैरसोय दूर व्हावी याच उद्देशाने येथील कृषी बाजार समिती परिसरात प्रायोगिक तत्वावर बाजारपेठ सुरू करण्यात आली. यासाठी शासनाने पाच कोटी रूपयांचा निधी दिला आहे. सध्या उन्हामुळे रेशीम पंूज तयार होण्यास अडचणी येत असल्याने बाजारात कोषाची आवक घटली आहे. जून ते आॅगस्ट महिन्यात रेशीम कोषाची बाजार पेठेत आवक वाढले. सिरसवाडी शिवारात लवकरच रेशीमकोष बाजारपेठेची सुसज्ज इमारत तयार करण्यात येणार आहे. याला एक वर्ष लागणार असल्याचे रेशीम विभागाचे सहाय्यक संचालक दिलीप हाके यांनी सांगितले.

 

टॅग्स :MarketबाजारArjun Khotkarअर्जुन खोतकर