प्रकाश आंबेडकर जालना दौऱ्यावर; निवडणुकीच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 21:31 IST2022-10-07T21:31:19+5:302022-10-07T21:31:25+5:30
आगामी महापालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडी एकटी लढेल, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर जालना दौऱ्यावर; निवडणुकीच्या पूर्वतयारीचा घेतला आढावा
जालना - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे जालना दौर्यावर होते. आगामी निवडणुकांच्या पूर्व तयारीचा आंबेडकरांनी आढावा बैठक घेतली..त्याचबरोबर आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रेसला युतीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र दोन्हीही पक्षांकडून या प्रस्तावाला प्रतिसाद मिळाला नाही.
आगामी महापालिका निवडणूक वंचित बहुजन आघाडी एकटी लढेल, असं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आंबेडकर आज जालन्यात होते.आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी आंबेडकर यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली यावेळी ते बोलत होते.घटना बदलणे हा भाजप आणि आरएसएसचा एकमेव अजेंडा असल्यानं काँग्रेस आणि शिवसेनेसमोर युतीचा प्रस्ताव ठेवला असंही त्यांनी स्पष्ट केलं.