पोलिसांनी जप्त केला लाखोंचा गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 00:46 IST2019-07-08T00:45:55+5:302019-07-08T00:46:25+5:30

रांजणी येथे रविवारी सायंकाळी शेख फिरोज शेख जानी यांच्या घरातून जवळपास ३० गोणी गुटका (बोरी) पोलिसांनी जप्त केला.

Police seized lakhs of gutkha | पोलिसांनी जप्त केला लाखोंचा गुटखा

पोलिसांनी जप्त केला लाखोंचा गुटखा

लोकमत न्यूज नेटवर्क
घनसावंगी : तालुक्यातील रांजणी येथे रविवारी सायंकाळी शेख फिरोज शेख जानी यांच्या घरातून जवळपास ३० गोणी गुटका (बोरी) पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षकांचे पथक व घनसांवगी पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकास खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. या माहितीवरून पथकातील पोलीस कॉन्स्टेबल विशाल काळे, भीमराव घोडके, केदारे, मनोज काळे, घनसांवगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस कॉन्स्टेबल रंजीत खटावकर, अमित ठाकूर यांनी रविवारी सायंकाळी रांजणी येथे कारवाई केली. यावेळी तीस गोण्यांमध्ये असलेला गुटखा जप्त करण्यात आला. मुद्देमाल पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांनी दिली. फिरोज शेख हा फरार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Police seized lakhs of gutkha