शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांचे जुगार अड्ड्यांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:28 IST

जालना : शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर सदर बाजार पोलिसांनी बुधवारी छापे टाकून हजारो रूपयांचा मुद्देमाल ...

जालना : शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर सदर बाजार पोलिसांनी बुधवारी छापे टाकून हजारो रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. सचिन चंद्रकात नामदे (२५, रा. अलंकार टॉकीजजवळ, काद्राबाद), राजू दशरथ जाधव (वय ६५, रा. पावरलूम जुनी एमआयडीसी, जालना), शिवलिंग अप्पा छगन अप्पा वीर (रा. अलंकार टॉकीजजवळ, जालना), रमेश माधव सोनवणे (६५, राजमहल टॉकीजजवळ, जालना), कैलास भीमसेन चव्हाण (रा. ६५. रा. कोष्टी गल्ली, जालना), कमलकिशोर पुसाराम बंग (रा. कालीकुर्ती) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर बाजार पोलिसांनी सिंधी बाजार परिसरातील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकून जुगार साहित्यासह रोख रक्कम असा ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी सचिन नामदेव शिवलिंग अप्पा छगन अप्पा वीर या दोघांना ताब्यात घेण्यात आले. बसस्थानक परिसरातून राजू जाधव यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून जुगार साहित्यासह रोख रक्कम ४९० रुपये जप्त करण्यात आले. शहरातील गवळीपुरा येथून रमेश सोनवणे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोख रक्कम ७५४० रुपये जप्त करण्यात आले. मंगळ बाजार येथून कैलास चव्हाण व कमलकिशोर बंग या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम १७१० रुपये जप्त करण्यात आले. या सहा संशयित आरोपींविरूध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोनि. संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मपोना खरजुले, पोना खार्डे, पोहेकॉ. लांडगे, तेलंग्रे यांनी केली.