शेतकऱ्याच्या डोळ््यात मिरची पावडर टाकून १० हजार लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:32 IST2019-05-13T00:32:28+5:302019-05-13T00:32:53+5:30
दुचाकीने घराकडे जात असताना तीन चोरट्यांनी दुचाकी अडवून शेतक-याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्या जवळील दहा हजार रुपये लुटून नेल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील दैठणा बु. शिवारात शनिवारी सायंकाळी सातवाजेच्या सुमारास घडली.

शेतकऱ्याच्या डोळ््यात मिरची पावडर टाकून १० हजार लुटले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दुचाकीने घराकडे जात असताना तीन चोरट्यांनी दुचाकी अडवून शेतक-याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्या जवळील दहा हजार रुपये लुटून नेल्याची घटना घनसावंगी तालुक्यातील दैठणा बु. शिवारात शनिवारी सायंकाळी सातवाजेच्या सुमारास घडली. शेतकरी विनायक लक्ष्मण पवार (५५) रा. दैठणा यांच्या फिर्यादीवरुन रविवारी अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अंबड पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, शेतकरी विनायक पवार हे शेवगा येथून दुचाकीने दैठणाकडे जात होते. सायंकाळी सात वाजता दैठणा शिवारातील शेतकरी रघुनाथ धांडे यांच्या शेतात जवळ आल्यानंतर तिघाजणांनी दुचाकीला हात दिला. गाव जवळ असल्याने कोणीतरी ओळखीचे असेल या उद्देशाने त्यांनी आपली दुचाकी थांबविली. मात्र दुचाकी थांबविताच पंचविस ते तीस वयोगटातील तिघांनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून जबर मारहाण केली. आणि त्यांच्या खिशातील रोख दहा हजार रुपये घेऊन पसार झाले. मारहाण झाल्याने शेतकरी पवार जाग्यावरच बेशुध्द पडले.