आगीत फोटो स्टुडिओ व हॉटेल खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:06 IST2018-10-12T00:05:38+5:302018-10-12T00:06:26+5:30

Photo studio and hotel khak in the fire | आगीत फोटो स्टुडिओ व हॉटेल खाक

आगीत फोटो स्टुडिओ व हॉटेल खाक

लोकमत न्यूज नेटवर्क
हसनाबाद : सीरसगाव वाघ्रळ येथील एका फोटो स्टुडिओ व एका हॉटेलला बुधवारी रात्री १० वाजता आग लागली. यात फोटो स्टुडिओ व हॉटेल जळून खाक झाले. मध्यरात्री उशिरा आग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. ही आग शॉर्ट सर्कीटने लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सीरसगांव येथील बस थांब्याजवळील वैभव फोटो स्टुडीओ व पेपर विक्रेता पंडित इंगळे यांचे दुकान आहे. बुधवारी रात्री त्यांनी फोटो स्टुिडीओ व ग्राहक सेवा केंद्र बंद केले. रात्री दहा वाजेस त्यांना शेजारील व्यक्तिने फोन करून दुकानात आग लागल्याचे सांगितले. ही आग शेजारच्या हॉटेलपर्यत गेली. तेथील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला व पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. आग आटोक्यात येत नसल्याने भोकरदन येथून अग्नीशामक दलाचा एक पंप बोलविण्यात आला. मध्यरात्री आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीत सुमारे चार लाख रुपये किमतीचे कॅमेरे, फर्निचर, काप्यूटर, मोबाईल हँडसेट, हॉटेल मधील साहित्य जळून कोळसा
झाले.

Web Title: Photo studio and hotel khak in the fire