शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी महत्त्वाची : ह. भ. प. ज्ञानेश्वर शेलूदकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

दैठणा खु. येथे कीर्तन सोहळा ; भविकांची मोठी उपस्थिती परतूर : यशस्वी होण्यासाठी जिद्द व चिकाटी महत्त्वाची आहे, असे ...

दैठणा खु. येथे कीर्तन सोहळा ; भविकांची मोठी उपस्थिती

परतूर : यशस्वी होण्यासाठी जिद्द व चिकाटी महत्त्वाची आहे, असे निरूपण ह. भ. प. ज्ञानेश्वर शेलूदकर यांनी केले. तालुक्यातील दैठणा खु. येथील मोरेश्वर संस्थानच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी रात्री ज्ञानेश्वर शेलूदकर यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते.

ह.भ.प. शेलूदकर म्हणाले की, कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी महत्त्वाची आहे. ध्येय गाठण्यासाठी तोल सांभाळणे गरजेचा आहे. कारण उंचीवर गेल्यावर चुकलात, तर खाली येण्याची भीती असते. त्यामुळे एकदा मोठे झाल्यानंतर मोठे कसे राहता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवे. शूरवीरांच्या गप्पा मारणं सोप आहे; पण रणांगणावर जाऊन युद्ध करणं अवघड असते. या देशाला संत, सती व शूर या तिघांनी सजवले आहे. त्यामुळे देशाचा जवान दिसला की, माझी मान झुकते, कारण आमचा सैनिक सीमेवर डोळ्यात तेल घालून उभा आहे, म्हणून आम्ही सुखाने झोपू शकतो, सुरक्षित राहू शकतो. भारत ही संतांची भूमी आहे. सेवा ही साधना आहे. पण ती कोणाची करावी, याला फार महत्त्व आहे. संतांनी प्राप्त करून घेतलेला ज्ञानरूपी ठेवा आपल्याला सहज मिळतो. कोणतीही गोष्ट मिळण्यासाठी परिश्रमाची गरज असते. यात थोडीही चूक झाली तर सर्वनाश व्हायला वेळ लागत नाही, असेही ते म्हणाले. यावेळी उपसरपंच संपत टकले, सुरेश सवने, अमृत सवने, अनिल मगर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती.

फोटो.

परतूर तालुक्यातील दैठणा खु. येथे कीर्तनात निरूपण करताना ह.भ.प. ज्ञानेश्वर शेलूदकर आदी.