अपघातात पादचारी महिला, चिमुकली ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 12:54 AM2018-12-07T00:54:28+5:302018-12-07T00:54:31+5:30

बोलेरो गाडी आणि एका पिकअपच्या झालेल्या अपघातात एक महिला आणि चार वर्षीय चिमुकली जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे घडली.

Pedestrians, chimukali killed in the accident | अपघातात पादचारी महिला, चिमुकली ठार

अपघातात पादचारी महिला, चिमुकली ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : बोलेरो गाडी आणि एका पिकअपच्या झालेल्या अपघातात एक महिला आणि चार वर्षीय चिमुकली जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.
अंबडकडून बीडकडे देवदर्शनासाठी निघालेली जीप (एम.एच.२१ व्ही.८२७७) गाडीच्यासमोर धाकलगावजवळ अचानक एक बकरी रस्त्यात आडवी आली. त्या बकरीस वाचवण्याच्या प्रयत्नात जीप चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेने शेतात मजुरीसाठी जाणाऱ्या सुकराबी बशिर पठाण (६०) या महिलेस भरधाव गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने त्या जागीच ठार झाल्या. या मार्गावरुन विरुध्द दिेशेने येणाºया दुसºया गाडीने (एम.एच. १४ डी. एफ. ९३०७) गाडीला धडक दिल्याने ती उलटली. यातील श्रुती शंकर धानुरे ( ४ ) (रा. बोधलापुरी ता. घनसावंगी) ही चिमुकली बोलेरो गाडी खाली दबल्याने जागीच ठार झाली. या अपघातातील जखमींना परिसरातील नागरिकांची मोठी मदत झाली. या मार्गावर अपघात होण्याची सत्र थांबता थांबेना. त्यामुळे या भागातून प्रवास करताना जीव मुठीत धरून जावे लागते.
या अपघातात रामभाऊ पुंड,आत्माराम मोरे, शंकर धानुरे, शिल्पा शंकर धानुरे,विजय पुंड (सर्व रा.बोधलापुरी ता.घनसावंगी) मॅक्झीमो गाडी चालक मुसा वाहेद (रा. धाकलगाव) असे सहा जण जखमी झाले.
अपघात झाल्यानंतर बोलेरो चालक गाडी सोडून घटनास्थळावरुन पळून गेला. बोलेरो चालकाने बेदरकार पणे गाडी चालवल्याने अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या अपघातामुळे या मार्गावर वाहनांची गर्दी झाली होती.

Web Title: Pedestrians, chimukali killed in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.