शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रवाशांना कळणार बसचे ‘लोकेशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:20 IST

विकास व्होरकटे जालना : लालपरीची तासनतास बस स्थानकांमध्ये प्रतीक्षा करत असलेल्या प्रवाशांना यापुढे बसची वाट पाहावी लागणार नाही. यासाठी ...

विकास व्होरकटे

जालना : लालपरीची तासनतास बस स्थानकांमध्ये प्रतीक्षा करत असलेल्या प्रवाशांना यापुढे बसची वाट पाहावी लागणार नाही. यासाठी जिल्ह्यातील २५० बसेसवर ‘जीपीएस यंत्रणा’ बसविण्यात आली आहे. ही यंत्रणा २० जानेवारीपासून कार्यान्वित करण्याचा महामंडळाचा मानस असून, त्या दृष्टीने एसटी महामंडळाचे कामकाज सुरू आहे, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी प्रमोद नेव्हूळ यांनी दिली.

आजही ‘बसचा प्रवास सुरक्षित प्रवास’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बसेसद्वारे प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत कमी नाही, परंतु अनेकदा वेगवेगळ्या कारणांमुळे बस नियोजित वेळेत आगारात येत नाही. त्यामुळे प्रवाशांना तासनतास बसची प्रतीक्षा करावी लागते. याचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हिच बाब हेरून महामंडळाच्या वतीने बसेसवर जीपीएस यंत्रणा बसविण्याच्या निर्णय मध्यंतरी घेण्यात आला होता. यानुसार, जिल्ह्यातील २५० बसेसवर आजवर ‘जीपीएस’ बसविण्यात आले आहे, परंतु यातील दूरच्या पुणे, मुंबई सारख्या ७० मार्गांवरच ही यंत्रणा सद्यस्थितीत कार्यान्वित करण्यात आली आहे. २० जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील गाव-खेड्यांमधील रस्त्यांसह सर्वच मार्गांवर जीपीएस यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी प्रवाशांनी महामंडळाचे असलेले अ‍ॅप्स मोबाइलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे. अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रवाशांना कोणती बस कुठे व कुठपर्यंत आली, शिवाय बस स्थानकात किती बस येतात व जातात. याची माहिती मिळणार आहे.

चौकट

जालना आगार प्रमुख पंडित चव्हाण म्हणाले, मागील दोन महिन्यांपासून आगारातील ७७ बसेसला ‘जीपीएस यंत्रणा’ बसविण्याचे काम सुरू होते. सध्या सर्वच बसेसवर ‘जीपीएस’ बसविण्यात आले आहे. हे सुरू झाल्यास प्रवाशांची वेळीची मोठी बचत होईल, त्यांना घर बसल्या कोणती बस कुठे आली, आगारात येण्यास किती वेळ लागेल, याची सर्व इत्यंभूत माहिती मिळेल, शिवाय कुठे बसचे ब्रेक डाऊन व अपघात झाल्यास आमच्या कर्मचाऱ्यांनाही वेळेवर व घटनास्थळी पोहोचण्यासाठी ‘जीपीएस यंत्रणेचा’ मोठा फायदा होणार असल्याची माहितीही आगार प्रमुख चव्हाण यांनी दिली.