लोकमत सखी मंचच्या वतीने जालना शहरात भोकरदन नाका परिसरातील भारती लॉन्सवर ६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता प्रख्यात गायिका वैशाली सामंत यांच्या म्युझिकल कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. ...
मुख्यमंत्री व्हिलेज फ्लॅगशिप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात आठ गावांची निवड करण्यात आली आहे. येथील ग्रामस्थांशी चर्चा करुन प्राधान्याने करावयाच्या विकास कामांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले. ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींना सोबत घेऊन प्रत्येकाला न्याय देण्याचे काम केले. त्यामुळे कुठल्याही जाती-धर्माचा द्वेष न करता शिवरायांचे विचार आचारणात आणावे, असे आवाहन शिवाजी महाराजाचे तेरावे वंशज छत्रपती खा़ संभाजी राजे भोसले यांनी केले. ...
वाढदिवसानिमित्त सार्वजनिक ठिकाणी मित्रांसोबत एकत्र येऊन तलवारीने केक कापणे एकाला चांगलेच महागात पडले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन कदीम जालना पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे. ...
बेमोसमी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचा अंतीम अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय कृषी सहसंचालकांकडे पाठवला आहे. त्यानुसार जिरायती, बागायती व फळपिके मिळवून २१ हजार ६७९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान दर्शविण्यात आले असून, भरपाईपोटी एकू ...
पैठण येथे नाथषष्ठीनिमित्त पायी दिंडीत निघालेले येथील वारकरी गुलाबराव भागाजी पुंगळे (६५) चित्तेपिंपळगाव येथे ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. शनिवारी ही घटना घडली. ...
भोकरदन तालुक्यातील धावडा येथे होळीच्या पाचव्या दिवसापासून पारंपारिक आई जगदंबा देवी स्वारी उत्सवास प्रारंभ होते. दोनशे वर्षाची परंपरा असलेला हा उत्सव यंदाही सोमवारपासून पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जाणार आहे. ...
अवैध धंद्यांत सहभागी असलेल्या काही व्यक्तींना पोलिसांनी हद्दपार केले असले तरी मटका व इतर अवैध धंदे मात्र जिल्ह्याच्या विविध भागांत बिनदिक्कत सुरु असल्याचे उघडकीस आले आहे. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी संपादित जमिनीच्या मोजणीत मूल्यांकन वाढवून घेण्यासाठी संयुक्त मोजणीपूर्वीच अनेकांनी बाहेरून आणलेली रेडीमेड झाडे लावून, ती जुनीच असल्याचे दाखविले. तर काही ठिकाणी फळबागांमधील झाडांची संख्या अधिक दाखवून मूल्यांकन वाढवून ...