म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सण उत्सव तसेच आपातकालीन परिस्थितीत चोख कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना बक्षीस वाटप करण्याचे आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी दिले होते. त्यासाठी राज्यातील सात परिक्षेत्रासाठी ४ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला. ...
अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरातील रामकाटा वस्तीजवळ गट क्रमांक ६२२ शिवारात युवकाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. ...
दूधाला वाढीव पाच रूपयांचा दर द्यावा या मागणीवरून स्वाभिमानी संघटनेच्या वतीने पुकारण्यात आलेल्या दूध संकलन बंद आंदोलनाचा फटका जालन्याला बसला आहे. बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या दूध पिशवीच्या दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ...
शहर वाहतूक शाखा तसेच रिक्षा, स्कूलबसचालक आणि पालकांची संयुक्त बैठक सोमवारी येथील राष्ट्रीय हिंदी महाविद्यालयात पार पडली. यावेळी अनेक मुद्यांवर चर्चा होऊन रिक्षातून विद्यार्थ्यांची होणाऱ्या वाहतुकीवर पायबंद आणला पाहिजे यावर एकमत झाले आहे. मात्र, यातून ...
गावठी पिस्तुलसह २ जिवंत काडतूस राहत्या घरात ठेवणाऱ्या शेख अली शेख जाफर (रा. हिना साबन फॅक्ट्री सिंधीकाळेगाव ता.जालना) यास तालुका जालना पोलिसांनी घरी छापा मारून पकडले. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. ...
गावात एकटी राहत असलेल्या एका ७५ वर्षीय वृध्देवर बलात्कार करुन खून केल्याची घटना सोमवारी बदनापूर तालुक्यातील राजेवाडीत उघडकीस आली. या प्रकरणी रतनसिंग महाजन गुसिंगे (३०) या संशयितास पोलिसांनी अटक केली. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी भोकरदन शहरातील जाफराबाद रोडवरील पुलाजवळ वाहनाच्या तपासणीमध्ये दमन राज्यातील विदेशी कंपनीचे ७ दारूचे बॉक्ससह १ लाख २८ हजार ५०३ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन जणाना अटक केली. ...
प्रभाग क्रमांक २३ मधील विविध विकास कामांच्या संचिका पालिकेच्या रेकॉडवर सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त केल जात आहे. जवळपास २५ लाखांची कामे त्यात प्रस्तावित आहेत. ...