राज्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता मृद संधारण व जल संधारण करण्यासाठी व स्थानिक वनस्पतीच्या प्रजाती नष्ट न होऊ देण्यासाठी राज्यामध्ये बायोडायव्हर्सीटी पार्कची चळवळ सरकार पुढे नेईल, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
मागील दहा ते बारा दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने शुक्रवारी दुपारी शहरासह जिल्ह्याच्या काही भागात हजेरी लावली. आष्टी, जामखेड, परतूर परिसरात दमदार पाऊस झाला. ...
प्राथमिक आरोग्य केंद्रावर अनुपस्थित आढळलेल्या २ वैद्यकीय अधिका-यांसह ८ कर्मचा-यांवर जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांनी एक दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई केली. ...
कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने उत्कृष्ठ कापूस पुढाकार प्रकल्पाद्वारे सामूहिकरीत्या कपाशीवर हल्ला करणाऱ्या शेंदरी बोंडअळीवर मात करण्यासाठी ७५० एकर क्षेत्रावर जवळपास साडेसात हजार कामगंध सापळे बसवून अनोखा प्रयोग केला आहे. ...
समाजात माणुसकीची ज्योत तेवत ठेवण्याच्या प्रयत्नात राहावे, एकोप्याने राहिल्याने समृद्धी नांदत असते, असे प्रतिपादन प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी केले. ...
राज्य शासनाने नव्यानेच सुरु केलेल्या महाडीबीटी पोर्टलव्दारे२०१८ -२०१९ या शैक्षणिक वर्षात तब्बल २३ हजार विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात २३ कोटी रुपयांची रक्कम विद्यार्थी आणि संबंधित महाविद्यालयाच्या बँकखात्यात आॅनलाईन वर्ग करण्यात आली. ...