पदमाकर सोळुंके यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:10+5:302021-07-07T04:37:10+5:30

मंत्री यांचा सत्कार जालना : भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या हस्ते बालरोगतज्ज्ञ डाॅ. स्वप्नील मंत्री यांचा ...

Padmakar Solunke felicitated | पदमाकर सोळुंके यांचा सत्कार

पदमाकर सोळुंके यांचा सत्कार

मंत्री यांचा सत्कार

जालना : भाजयुमोचे प्रदेश सरचिटणीस राहुल लोणीकर यांच्या हस्ते बालरोगतज्ज्ञ डाॅ. स्वप्नील मंत्री यांचा कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्यस्तरीय शिवसृष्टी पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरपंच असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न कणसे, संपत टकले हे हजर होते.

जांबसमर्थ परिसरात हरणांचा धुमाकूळ

घनसावंगी : तालुक्यातील जांबसमर्थ परिसरात हरणांनी धुमाकूळ घातला आहे. सततच्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे पीक जगवताना शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. मशागतीपासून ते लागवडीपर्यंत वारेमाप खर्च करून कष्टाने जगवत असलेली पिके वन्य प्राण्यांकडून फस्त केली जात आहेत. जांबसमर्थ परिसरात सोयाबीन, कापूस पिकांची हरिण, रानडुक्कर हे प्राणी नासाडी करीत आहेत.

दहीपुरी येथे ५५५ झाडांची लागवड

अंबड : अंबड तालुक्यातील दहीपुरी शिवारात प्रहारचे जिल्हाध्यक्ष विदुर लाघडे, ह. भ. प. त्रिंबक नरवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमनाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सौजन्याने कडुनिंब, करंज, चिंच, गुलमोहर इत्यादी ५५५ झाडांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी राजेंद्र गायकवाड, सुमनबाई लाघडे, योगीता दौंड, माहीजी वादे, कैलास गायके हे हजर होते.

रोहयोच्या कामाची बीडीओंकडून पाहणी

भोकरदन : तालुक्यातील जळगाव सपकाळ येेथे रोहयोअंतर्गत सुरू असलेल्या कामांची गटविकास अधिकारी यु. डी. राजपूत यांच्याकडून पाहणी करण्यात आली. यावेळी रोजगार हमीचे इंजिनीअर चव्हाण, ग्रामविकास अधिकारी महेंद्र साळवे, डाॅक्टर शालिकराम सपकाळ, प्रशांत बुरकुले, विष्णू सपकाळ, अभिमन्यू साळवे, मधुकर साळवे, सुरेश साळवे हे हजर होते.

विविध मागण्यांचे निवेदन सादर

जाफराबाद : खडकपूर्णा प्रकल्पातून उपसा सिंचन टप्पा क्रमांक ४मधून नदीद्वारे कोनड बु. व सोनखेडा तलावांमध्ये पाणी सोडण्याची मागणी खडकपूर्णा प्रकल्प अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, रमेश गव्हाड, मंगेश गव्हाड, समाधान काकडे, विजय वायाळ आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.

पावसाची प्रतीक्षा

जाफराबाद : तालुक्यात आठवडाभरापासून पावसाने दडी मारल्याने नुकतीच पेरणी झालेली पिके सुकू लागली आहेत. जूनच्या शेवटच्या आठवड्यात अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी केलेली लागवड कडक उन्हामुळे नष्ट होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

Web Title: Padmakar Solunke felicitated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.