रात्रगस्तीमुळे घरफोड्या करणाऱ्यांना लगाम..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:26 AM2019-09-30T00:26:23+5:302019-09-30T00:26:54+5:30

वाढलेल्या घरफोड्या थांबविणे आणि चोरट्यांना लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी २५ आॅगस्टपासून जिल्ह्यात रात्रगस्तीवर विशेष उपक्रम सुरू केला.

Overnight brutal halting ..! | रात्रगस्तीमुळे घरफोड्या करणाऱ्यांना लगाम..!

रात्रगस्तीमुळे घरफोड्या करणाऱ्यांना लगाम..!

Next

विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वाढलेल्या घरफोड्या थांबविणे आणि चोरट्यांना लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी २५ आॅगस्टपासून जिल्ह्यात रात्रगस्तीवर विशेष उपक्रम सुरू केला. जिल्हा ते ठाणे अशा तीन स्तरावर ही गस्त राबविली जात आहे. परिणामी आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत १६ घरफोड्या झाल्या आहेत. घरफोड्यांचे हे प्रमाण जुलै- आॅगस्ट मध्ये ६२ इतके होते.
उद्योगनगरी असलेल्या जालना शहरासह जिल्हाभरात घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. घरफोड्यांचे हे प्रमाण घटविण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. २५ आॅगस्ट पासून रात्रगस्तीत मोठे बदल करण्यात आले आहेत. ठाणेस्तरावरील गस्तीवर लक्ष ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांची सुपर चेकींग तैनात करण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील सर्वच गस्तीची माहिती, नियंत्रणासाठी जिल्हास्तरावरील उपविभागीय पोलीस अधिकारी आणि एलसीबीचे पोलीस निरीक्षक यांची टीम कार्यरत ठेवण्यात आली आहे. रात्रगस्तीवरील अधिकारी, कर्मचा-यांना गणवेश सक्तीचा करण्यात आला असून, संबंधितांकडे शस्त्रेही ठेवण्यात आली आहेत. विशेषत: दर दोन तासांनी व्हिजिट बूक ठेवलेल्या ठिकाणावर जाऊन नोंदी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. बँका, सराफा मार्केट, बाजारपेठेसह महत्त्वाच्या ठिकाणी, शहरातील, गावातील विविध भागात ही रात्रगस्त वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील १८ पोलीस ठाण्याची गस्त पथके त्यावरील उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या सुपर चेकिंगचे असलेले नियंत्रण आणि जिल्हा पथकाकडून सर्वच ठिकाणी ठेवले जाणारे नियंत्रण यामुळे रात्र गस्तीला शिस्त लागल्याचे चित्र आहे.
परिणामी आॅगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात १८ घरफोड्या झाल्या आहेत. घरफोड्यांचे प्रमाण जुलै ते आॅगस्ट या कालावधीत ६२ इतके होते. विशेषत: जालना शहरात ५ घरफोड्यांची नोंद झाली असून, यातील तीन घरफोड्या या रात्री व दोन घरफोड्या या दिवसा झाल्या आहेत.
दरम्यान, निवडणुकीच्या कालावधीतही ठिकठिकाणच्या चेक पॉइंटवर तपासणी केली जात आहे. वाहनांमधून वाहतूूक केल्या जाणाºया साहित्यांची तपासणी करण्यासह सराईत गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्याचे काम जिल्हा पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी करीत आहेत.
गुन्हेगारांच्या नोंदी : पहाटे अहवाल सादर
गस्तीवरील अधिकारी, कर्मचारी गुन्हेगार, सराईत गुन्हेगार, फरारी गुन्हेगारांच्या घरी जाऊन तपासणी करीत आहेत. संबंधितांची माहिती घेऊन त्याच्या नोंदी एका माहितीपत्रकावर घेतल्या जात आहेत.
जिल्ह्यातील सर्वच गस्त पथकांनी रात्रभर केलेल्या कामकाजाचा अहवाल पहाटे ५ ते ५.३० पर्यंत कंट्रोल रूममध्ये व्हाटस्अ‍ॅप ग्रुपवर दिला जात आहे.
हा अहवाल स्थानिक गुन्हे शाखेकडे येतो. स्थानिक गुन्हे शाखेत सर्व ठिकाणची माहिती संकलित करून एकत्रित अहवाल पोलीस अधीक्षकांना, अपर पोलीस अधीक्षकांना दिला जातो. त्यानंतर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार हे रात्र गस्तीबाबत ठाणे प्रभारींसह कर्मचा-यांना आवश्यक त्या सूचना देत आहेत.
वाहतूक शाखा, एडीएससह इतर विभाग कार्यरत
रात्रगस्तीवर वाहतूक शाखा, एडीएस पथक, कंट्रोल रूममधील अधिकारी, कर्मचा-यांची पथकेही तैनात करण्यात आली आहेत. ही पथके तैनात राहिल्याने रात्रगस्तीचे काम प्रभावीपणे होण्यास मदत झाली आहे.
धार्मिक स्थळे, पुतळा परिसरालाही भेटी
रात्रगस्तीत मंदिर, मशिद आदी धार्मिक स्थळांसह महापुरूषांच्या पुतळ्यांची पाहणी केली जात आहे. शिवाय रात्रगस्तीवर ठिकठिकाणी असलेल्या गार्डचीही पाहणी ही पथके करीत आहेत. विशेषत:
गस्तीवर असताना ठराविक कालावधीत जिल्हास्तरावरील
ग्रुपवर फोटो टाकणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
दिवसाच्या चो-या, वाहन चो-यांकडे लक्ष हवे
जालना शहरातील म्हाडा कॉलनी भागात नुकतीच भरदिवसा घरफोडी झाली आहे. इतर भागातही घटनांची घडल्या आहेत. त्यामुळे दिवसा होणा-या घरफोड्या, वाहन चोरी रोखण्यासाठीही जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे.

Web Title: Overnight brutal halting ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.