निम्न दुधन प्रकल्पात केवळ ४२ टक्के जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:26 IST2018-04-09T00:26:04+5:302018-04-09T00:26:04+5:30
परभणी व पूर्णा शहराच्या पाणी टंचाई निवारणार्थ निम्न दुधना प्रकल्पातून सोडण्यात आल्याने धरणातील जलसाठा घटला आहे. तीन वेळेस पाणी सोडण्यात आल्यामुळे धरणात आता केवळ ४२ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे.

निम्न दुधन प्रकल्पात केवळ ४२ टक्के जलसाठा
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : परभणी व पूर्णा शहराच्या पाणी टंचाई निवारणार्थ निम्न दुधना प्रकल्पातून सोडण्यात आल्याने धरणातील जलसाठा घटला आहे. तीन वेळेस पाणी सोडण्यात आल्यामुळे धरणात आता केवळ ४२ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे.
निम्न दुधना प्रकल्पावर या वर्षी परतूर, सेलू, परभणी व पूर्णा या मोठ्या शहरांसह परिसरातील चाळीस खेड्यांची तहान भागविण्याचा भार आहे. या धरणातून टँकरनेही मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे.
यावर्षी निम्न दुधना धरण पुर्ण क्षमतेने भरले नव्हते. पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणात ८० टक्केच जलसाठा झाला. यंदा परभणी व पूर्णा शहराचा पाणीप्रश्न गंभीर झाल्याने या धरणातून तिसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले. शिवाय तालुक्यात सिंचनासाठी धरणाच पाणीसाठ्याचा वापर होत असल्याने पाणीपातळीमध्ये घट झाली आहे. त्यामुळे उन्हाळ्याचे पुढील तीन महिने या धरणातील पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.