उष्माघातामुळे एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:02 IST2018-04-29T01:02:48+5:302018-04-29T01:02:48+5:30

अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात उन्हाच्या तीव्रतेमुळे शुक्रवारी रात्री एकाचा मृत्यू झाला.

One's death due to sunstroke | उष्माघातामुळे एकाचा मृत्यू

उष्माघातामुळे एकाचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
वडीगोद्री : अंबड तालुक्यातील वडीगोद्री परिसरात उन्हाच्या तीव्रतेमुळे शुक्रवारी रात्री एकाचा मृत्यू झाला.
येथे गत १५ वर्षांपासून सुदाम नावाचा मनोरुग्ण राहत होता. बुधवारी त्याला अचानक उलट्या सुरू झाल्याने नारायण डहाळे, ताराचंद पवार आदींनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून अंबड उपजिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. हा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील जावळे यांनी सांगितले.

Web Title: One's death due to sunstroke