संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्यास एक लाख; जालन्यातून झाले बक्षीस जाहीर

By शिवाजी कदम | Updated: July 31, 2023 18:58 IST2023-07-31T18:08:22+5:302023-07-31T18:58:53+5:30

महापुरुषांबद्दल अपशब्द वापरल्याने संभाजी भिडे सध्या चर्चेत आहेत

One lakh for cutting Sambhaji Bhide's moustache; Prize announced from Jalanya | संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्यास एक लाख; जालन्यातून झाले बक्षीस जाहीर

संभाजी भिडेंची मिशी कापणाऱ्यास एक लाख; जालन्यातून झाले बक्षीस जाहीर

घनसावंगी:  महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांची मिशी कापणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. येथील समता परिषदेचे माजी जिल्हा अध्यक्ष नवनाथ वाघमारे यांनी हे बक्षीस जाहीर केले आहे. सध्या सोशल मीडियावर या बक्षिसाची चर्चा सुरू आहे. 

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख असलेले संभाजी भिडे नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात. संभाजी भिडे यांनी महात्मा जोतिबा फुले, शिर्डीचे साईबाबा, महत्मा गांधी, पंडित नेहरू , राजा राममोहन राय यांच्यासह अनेक महापुरुषांविषयी अपशब्द वापरले असल्याचा आरोप आहे. दरम्यान, महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भिडे यांच्यावर अमरावतीत गुन्हाही दाखल झाला आहे. राज्यभर त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात निदर्शने सुरु आहेत. 

दरम्यान, सरकार अशा प्रवृत्तीच्या व्यक्तींना पाठीशी घालत असल्याचा आरोप आहे. समाजात वाद निर्माण होईल, अशी वक्तव्य थांबवली गेली पाहिजेत. यामुळे  संभाजी भिडेंची जो  मिशी कापेल त्याला मी एक लाख रुपयाचे बक्षीस देईल, असे नवनाथ वाघमारे यांनी सोशल मीडियाद्वारे जाहीर केले आहे.

Web Title: One lakh for cutting Sambhaji Bhide's moustache; Prize announced from Jalanya