कार अपघातात एक ठार, तीन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 00:32 IST2018-07-31T00:31:59+5:302018-07-31T00:32:11+5:30
दावलवाडी शिवारात एका कारला अपघात होऊन एकजण ठार व तीनजण जखमी झाले आहेत

कार अपघातात एक ठार, तीन जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : तालुक्यातील दावलवाडी शिवारात एका कारला अपघात होऊन एकजण ठार व तीनजण जखमी झाले आहेत
तालुक्यातील दावलवाडी शिवारात जालना-औरंगाबाद महामार्गावर सोमवारी सकाळी सहा ते सात वाजेच्या दरम्यान घोडबंदर मुंबई येथील एक जैन कुटुंबीय देवदर्शनाकरीता विदर्भाकडे कार क्रं. एम एच -०४ एचएन ५७७९ ने औरंगाबादकडुन जालन्याकडे जात असताना या कारला अचानक अपघात झाला त्यात ही कार पलटी झाली. यावेळी परिसरातील नागरीकांनी या कार कडे धाव घेवून, कारमधील प्रवाशांना बाहेर काढून जखमींना दवाखान्यात पाठविले. सदर अपघातात हसमुख धनराज जैन (३०) रा मानपाडा ठाणे घोडबंदर मुंबई हे ठार झाले तसेच अमृताबाई दुलचंद जैन (७०) हया गंभीर जखमी असुन महावीर दुलचंद जैन (३०) व निलम संदीप जैन वय (२८) हे जखमी झाले असल्याची माहिती पोहेकॉ काळे यांनी दिली सदर घटनास्थळी एएसआय कांदे व काळे यांनी भेट दिली.
या कारमधे संदीप जैन वय ३,देवाड महावीर जैन वय २,सिध्दी महावीर जैन वय ४ अशी मुले होती. सुदैवाने या अपघातात बालके ते सुखरूप आहेत.