अपघातात एक जण ठार; एक अत्यवस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:47 IST2018-06-14T00:47:25+5:302018-06-14T00:47:25+5:30
औद्योगिक वसहातीतील गेडोर कंपनी जवळ बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास टेंपो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यात एक युवक ठार तर अन्यएकजण गंभीर जखमी असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीसांनी सांगितले.

अपघातात एक जण ठार; एक अत्यवस्थ
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदनझिरा : येथील औद्योगिक वसहातीतील गेडोर कंपनी जवळ बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास टेंपो आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. त्यात एक युवक ठार तर अन्यएकजण गंभीर जखमी असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीसांनी सांगितले.
जालन्याकडून जाणाऱ्या टेंपो क्रं. एमएच, १४, जीबी-४०१४ ने औद्योगिक वसाहतीतून जालन्याकडे येणा-या दुचाकी एमएच, २१, जे - ६३२६ स्वाराला समोरून जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील शेख सोहेल शेख नबाब वय २० याच्या डोक्यावरून टेंपोचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला, तर शेख सोहेल शेख लाला (२२) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार केल्यावर त्याला तातडीने औरंगाबाद येथील शासकीय रूग्णालयात अधिक उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती तपास अधिकारी शेख नजीर यांनी दिली. या प्रकरणी अपघातील टेंपो चंदनझिरा पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आला असून, चालकाविरूध्द निष्काळजीपणाने गाडी चालवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे शेख नजीर यांनी सांगितले.