शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

खाजगी बस उलटून एक ठार, १५ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:53 IST

नागपूरहून २४ प्रवासी घेऊन पुण्याला भरधाव वेगात जाणारी एक ट्रॅव्हल्स बस जालना शहराजवळील वन विभागाच्या कार्यालयाजवळ उलटली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नागपूरहून २४ प्रवासी घेऊन पुण्याला भरधाव वेगात जाणारी एक ट्रॅव्हल्स बस जालना शहराजवळील वन विभागाच्या कार्यालयाजवळ उलटली. विशेष म्हणजे, या बसने तीन झाडांना धडक देत दोन पलट्या खाल्याने ही बस रस्त्यालगत असलेल्या खोल खड्ड््यात पडली. हा अपघात गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास झाला. या अपघातात एक महिला ठार तर, अन्य १५ प्रवासी जखमी झाले आहेत. सुरेखा जयंत खडतकर ( ४६, रा. हडपसर, पुणे ) असे मयत महिलेचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरवरून पुण्याकडे २४ प्रवाशांना घेऊन एक ट्रॅव्हल्स (क्रं. एमएच.१४.जीयु. ४३९८) ही बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता निघाली होती. गुरुवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने जालना शहरालगतच्या बायपास रोडने जात होती. यावेळी वन विभागाच्या कार्यालय जवळील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून बस तीन झाडांना धडकली. दोन पलट्या खात बस रस्त्याच्या बाजूला पडली. दरम्यान, बसला टेलिफोनचे केबल अडकल्याने बस थांबली असल्याची माहिती प्रवासी नंदकिशोर ठाकूर यांनी दिली.यात प्रवासी सुरेखा जयंत खडतकर यांचा जागीच मृत्यू झाला तर योगेश शहाद मुंजाल, मलकियतसिंग मनिंदरसिंग, बाबूराव अंतराम एखंडे, मंजुळा बाबूराव एखंडे, अमित गोपालराव शहा, सतीश ओमप्रकाश बजाज, रूची संतोष बजाज, नंदिनी चंद्रकांत तळवतकर, मुस्तफा शब्बीर बोहरा, नंदकिशोर दादारावजी ठाकरे, अशिका नंदकिशोर ठाकरे, सुरभि शरद बोस, श्रेया संजय चोपकर, स्नेहल अनिल सियाले, गजानन भागवत शिंदे हे प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी गाडी चालक महिंद्र दौलतराव सावरकर (३३, रा. अमरावती ) याच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, बस ही ६० ते ६५ च्या स्पीडने होती. परंतु, वळण रस्ता अचानक आल्याने मी बसचे ब्रेक लावले.परंतु, बसचे ब्रेक न लागल्यामुळे माझे नियंत्रण सुटल्याचे बसचालक महिंद्र सावरकर यांनी सांगितले.‘त्या’ तिघांनीच जखमींना काढले बाहेर : दिशादर्शक फलकच नाहीबसमधील नंदकिशोर ठाकूर (रा. नागपूर) मुस्ताफा बोहरा (वर्धा) आणि मुलकेत सिंग (जुम्म) या तिघांनी बसच्या खडकीची काच फोडून सर्व प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर प्रवाशांना रुग्णवाहिकेने शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात नेण्या येऊन उपचार करण्यात आले.सिंदखेडराजा चौफुली ते देऊळगावराजा चौफुली दरम्यान वन विभागाच्या कार्यालयाजवळ मोठे वळण आहे. येथून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. परंतु, या वळणावर दिशादर्शक फलकच नसल्याचे दिसून आले. त्यामुळे रात्रीच्यावेळी वाहनधारकांना वळण आलेलेच समजत नाही.या रस्त्यावरुन दररोज वेगाने वाहने धावतात. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे व वळण असल्याने वाहन चालकांना समोरुन येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच अपघात होतात. आठ दिवसांपूर्वीच जनावरे घेऊन जाणारे एक ट्रक या ठिकाणी उलटले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एकूणच हा रस्ता अपघताचे स्थळ झाल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. वळण रस्त्यावर कुठेच गतीरोधक नसल्याने देखील अपघातांमध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू