One and a half lakhs of marijuana seized in Satona | सातोना येथे दीड लाखाचा गांजा जप्त

सातोना येथे दीड लाखाचा गांजा जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : तालुक्यातील सातोना (खु.) येथील एका घरात असलेल्या गांजाच्या साठ्यावर पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली असून, कारवाईत दीड लाखाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
सातोना (खु.) येथील बाळू आकात याने बेकायदेशीररित्या घरातच गांजा ठेवल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक निलेश तांबे यांना मिळाली होती. या माहितीवरून शनिवारी रात्री पथकाने सातोना (खु.) येथे कारवाई केली. यावेळी बाळू आकात याच्या घरातून एक लाख ४८ हजार रूपये किंमतीचा १४ किलो ८३६ ग्राम गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोउपनि सुनील बोडखे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपअधीक्षक नीलेश तांबे, पोकॉ गणेश शिंदे, वैद्य, नवले, काळे आदींच्या पथकाने केली.

Web Title: One and a half lakhs of marijuana seized in Satona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.