अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहावे- जानकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:20 IST2018-12-22T00:19:55+5:302018-12-22T00:20:07+5:30
शेतक-यांनी बियाणांची मागणी केल्यास ते तातडीने पुरवण्यासह दुष्काळी भागातील शेतक-यांना हवी ती मदत करण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी दिले.

अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहावे- जानकर
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असल्याने गाळपे-यांमध्ये चारा लागवडीसाठी प्राधान्य द्यावे, यासाठी शेतक-यांनी बियाणांची मागणी केल्यास ते तातडीने पुरवण्यासह दुष्काळी भागातील शेतक-यांना हवी ती मदत करण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी दिले.
शुक्रवारी दुपारी जानकर यांच्या उपस्थितीत दुष्काळी आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बनिवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. एच. डाकोरे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एल. के. कुरेवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जे.पी. गुट्टे, सहायक आयुक्त जगदीश बुक्तरे, डॉ. अनिल दुबे, डॉ. असरार अहेमद आदींची उपस्थिती होती. यावेळी जानकर म्हणाले की, मराठवाड्यात दुष्काळाचे मोठे संकट आहे. हे लक्षात घेऊन अधिकारी, कर्मचा-यांनी आळस झटकून काम करावे असे सांगून, शेतकºयांना शक्य ती मदत करण्याचे निर्देश दिले. पुढील महिन्यात जालन्यात होऊ घातलेल्या राष्ट्रीय पशुप्रदर्शनाची आवश्यक ती तयारी करण्याचे निर्देश दिले. यावेळी राज्यमंत्री खोतकर यांनी देखील पाणी टंचाई आणि अन्य कामांबाबत अधिका-यांनी दक्ष राहण्याचे निर्देश दिले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी संगीता सानप यांनी इव्हीएम विषयी माहिती दिली.