दोन लाख विद्यार्थ्यांना सुटीतही पोषण आहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:10 IST2019-04-01T00:10:17+5:302019-04-01T00:10:46+5:30
दुष्काळी परिस्थितीत टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना सरकारच्यावतीने सुटीतही पोषण आहार देण्यात येणार आहे

दोन लाख विद्यार्थ्यांना सुटीतही पोषण आहार
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, अशा दुष्काळी परिस्थितीत टंचाईग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना सरकारच्यावतीने सुटीतही पोषण आहार देण्यात येणार आहे. त्यानूसार जिल्ह्यातील १ हजार ९१३ शाळांमधील पहिले ते आठवीपर्यंतच्या २ लाख ५१ हजार ८७८ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई भासत असून, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सरकारने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केला असून, अशा दुष्काळी परिस्थितीत शालेय विद्यार्थ्यांना सरकारतर्फे उन्हाळी सुट्ट्यातही पोषण आहार देण्यात येणार आहे. या विद्याथार्यांना आठवड्यातील ३ दिवस दूध, अंडी, फळे व पौष्टिक आहार देण्यात येत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १ हजार ९१३ शाळांमधील पहिले ते आठवीपर्यंतच्या २ लाख ५१ हजार ८७८ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहेत.
यात जालना तालुक्यातील ६३८९५, बदनापूर १९७८४, अंबड ३७३४७, घनसावंगी २८३३३, मंठा २०६९५, परतूर २२०५९ , भोकरदन २७१९७, तर जाफराबाद तालुक्यातील २०४१८ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले.