शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

आता जालना महानगरपालिका बनली 'फॅमिली कॉर्पोरेशन', राजकीय दिग्गजांच्या कुटुंबीयांचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 16:30 IST

अनेक ठिकाणी मतदारांनी परिचित नावांवर विश्वास दाखवला असून, घराणेशाहीचा राजकीय वारसा पुढे सुरू असल्याची चर्चा सध्या शहराच्या राजकारणात रंगताना दिसत आहे.

- राहुल वरशिळ जालना : जालना महानगरपालिकेच्या शहर निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला असून, या निवडणुकीत शहरातील विविध प्रभागांत राजकीय दिग्गजांच्या कुटुंबीयांनी मोठे यश संपादन केले आहे. पत्नी, कन्या, आई-मुलगा, पती-पत्नी, वडील-मुलगा अशा नातेसंबंधातील उमेदवारांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत, नगरसेवक पदाचा मान पटकावला आहे.

मनपा निवडणुकीत आमदार अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना विजय झोल यांनी प्रभाग क्रमांक १६-क मधून शिवसेनेकडून विजय मिळविला. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी प्रभाग क्रमांक १-इ तर त्यांची पत्नी सुशीला दानवे यांनी प्रभाग क्रमांक १-क मधून भाजपच्या वतीने निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्याने यश मिळविले. माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची पत्नी संगीता गोरंट्याल (प्रभाग ६-अ) आणि मुलगा अक्षय गोरंट्याल (प्रभाग ५-अ) हे दोघेही भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरले होते. या आई-मुलानेही मतदारांचा विश्वास संपादन केला.

जालना शहर महापालिका निवडणुकीत महावीर ढक्का यांनी प्रभाग क्रमांक ९-क तर, त्यांचे पुत्र विक्रांत ढक्का यांनी प्रभाग क्रमांक २-ड मधून भाजपतर्फे निवडणुकीत यश संपादन केले आहे.

पाचफुले दाम्पत्य निवडणुकीत झाले पराभूतअशोक पांगारकर यांनी प्रभाग १४ 'ब' मधून, तर त्यांच्या पत्नी उषा पांगारकर यांनी प्रभाग १६-ब मधून विजय संपादन केला, तर दुसरीकडे, शिवसेनेकडून निवडणूक लढवलेल्या विष्णू पाचफुले (प्रभाग ९-क) आणि त्यांची पत्नी रंजिता पाचफुले (प्रभाग २-अ) यांना मात्र मतदारांनी नाकारल्याचे चित्र दिसून आले.

राजकीय वर्तुळात चर्चेला आले उधाणजालना शहर महानगरपालिका निवडणुकीत नातेसंबंध आणि राजकीय दिग्गजांच्या कुटुंबातील उमेदवारांनी मिळविलेल्या यशामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.अनेक ठिकाणी मतदारांनी परिचित नावांवर विश्वास दाखवला असून, घराणेशाहीचा राजकीय वारसा पुढे सुरू असल्याची चर्चा सध्या शहराच्या राजकारणात रंगताना दिसत आहे.या मनपा निवडणुकीत एकाच कुटुंबातील आठ उमेदवारांनी यश संपादन केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलेच उधाण आले असून, आता पती-पत्नी, आई-मुलगा आणि वडील-मुलगा पहिल्यांदाच महापालिकेत नगरसेवक म्हणून काम पाहणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Jalna Municipal Election: Political families dominate, dynasty politics thrives.

Web Summary : Jalna's municipal election saw political dynasties flourish, with relatives of prominent leaders securing victories. Spouses, children, and parent-child duos won seats, sparking discussions about family dominance in local politics.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Jalna Municipal Corporation Electionजालना महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६