शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
6
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
7
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
8
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
9
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
10
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
11
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
12
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
13
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
14
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
15
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
16
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
18
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
19
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
20
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी

जालना लोकसभेसाठी बाहेरचा उमेदवार नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:37 AM

लोकसभेच्या निवडणुका अद्याप सहा महिने दूर असल्यानतरी सर्वच राजकीय पक्षांकडून आतापासूनच उमेदवारांची चाचपणी करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभेच्या निवडणुका अद्याप सहा महिने दूर असल्यानतरी सर्वच राजकीय पक्षांकडून आतापासूनच उमेदवारांची चाचपणी करत आहेत. याचाच एक भाग म्हणून गुरूवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.यावेळी माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी थेट भूमिका घेत काँग्रेसला यंदा जालना लोकसभा मतदारसंघात पोषक वातावरण असून, सरकारच्या धोरणांवर जनता प्रचंड नाराज आहे. त्यामुळे काँग्रेसमधीलच उमेदवाराला प्राधान्य देऊन यावेळी बाहेरील उमेदवार लादू नये असे स्पष्ट मत बैठकीत व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान कैलास गोरंट्याल यांच्या या वक्तव्याचे दुहेरी अर्थ निघत आहेत. बाहेरील उमेदवार म्हणजे जालना जिल्ह्याबाहेरील का काँग्रेस पक्षाबाहेरील या बबतचा संभ्रम अद्याप कायम असल्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू आहे.या बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विमलताई आगलावे, ज्ञानेश्वर भांदरगे, माजी आ. धोडींराम राठोड, माजी नगराध्यक्ष बाबूराव कुलकर्णी राजेश राठोड आदींसह अन्य काँग्रेस नत्यांची उपस्थिती होती. जालना लोकसभेचा १९९९ पासूनचा विचार केल्यास खा.रावसाहेब दानवे यांच्य विरूध्द १९९९ मध्ये ज्ञानदेव बांगर हे होते, २००४ मध्ये माजी खा. उत्तमसिंग पवार तर २००९ मध्ये कल्याण काळे यांनी निवडणुक लढवली होती. त्यांनी प्रचंड ताकद लावून दानवेंचे मताधिक्य ८ हजारांवर आणले होते. २०१४ मध्ये देखील औरंगाबाद येथील विलास औताडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यावेळी मोदी लाटेवर स्वार होत, रावसाहेब दानवे यांनी थेट दोन लाखाच्या मताधिक्याने विजय मिळविला होता.ज्ञानदेव बांगर वगळता अन्य तीनही निवडणुकीत दानवेंविरूध्द अन्य जिल्ह्यातील म्हणजेच औरंगाबाद येथील उमेदवारांना उमेदवारी दिली होती. परंतु ते जालना लोकसभा मतदार संघातीलच होते.निवडणुकांच्या तयारीला आला वेगमुंबईतील टिळक भवनमध्ये मराठवाड्यातील लोकसभेच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी जालना लोकसभा मतदार संघातून यंदा लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली. त्यात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव बांगर, डॉ.संजय लाखे पाटील, राजाभाऊ देशमुख, भीमराव डोंगरे, सत्संग मुंडे, यांनी तयारी दर्शविली. यावेळी २००९ मध्ये लोकसभा निवडणूक लढविणारे कल्याण काळे यांनी मात्र यंदा लोकसभा निवडणुक लढविण्यास नकार दिला आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा खा. रावसाहेब दानवे यांनी सलग चारवेळेस जालना लोकसभा मतदार संघातून विजय संपादन केला आहे. त्यामुळे त्यांच्या पाचव्या टर्मला त्यांच्या विरोधात नेमका कोणता उमेदार रिंगणात उतरणार आहे, या बाबत आतापासूनच तर्कवितर्क लावले जात आहेत. दानवेंचा विजयी रथ रोखण्यासाठी विरोधकांना तगड्या उमेदवाराला निवडणुक रिंंगणात उतरविण्याची गणिते जुळविण्याची गरज आहे.

टॅग्स :lok sabhaलोकसभाcongressकाँग्रेस