शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

सुखद ! जालना ते खामगाव रेल्वे मार्गासाठी नव्याने सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 12:54 IST

New survey for Jalna to Khamgaon railway line : २०१२ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी जालना ते खामगाव रेल्वे मार्गाचे संपूर्ण सर्वेक्षण करून अहवाल देण्याचे नमूद केले होते.

ठळक मुद्देविदर्भातील खामगाव ते जालनादरम्यान रेल्वे मार्ग करण्याची जुनी मागणी आहे.हा मार्ग रेल्वेस प्रवासी, तसेच मालवातुकीसाठीदेखील आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याचा अहवालजालना-खामगाव मार्गावर प्रवासी आणि मालवाहतुकीचे प्रमाण मोठे आहे.

जालना : जालना ते बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव या रेल्वे मार्गाचे नव्याने सर्वेक्षण करण्यासाठी मुंबईस्थित मध्य रेल्वे कन्स्ट्रक्शन विभागाचे एक पथक ४ ते ८ जानेवारीदरम्यान विविध गावे, बाजार समिती आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या मार्गावरील वाहतुकीसंदर्भातील सद्य:स्थिती जाणून घेणारा अहवाल ते रेल्वेला सादर करणार आहेत.

या सर्वेक्षणाच्या कामासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आ. संतोष दानवे यांनी दिली. विदर्भातील खामगाव ते जालनादरम्यान रेल्वे मार्ग करण्याची जुनी मागणी आहे. या मार्गासाठी इंग्रजांच्या काळात काही ठिकाणी कामही सुरू झाले होते; परंतु नंतर हा मार्ग मागे पडला. मध्यंतरी जालना आणि खामगाव येथेही रेल्वे संघर्ष समिती, उत्तर भारतीय संघ, तसेच मराठवाडा विकास परिषदेच्या माध्यमातून अथक प्रयत्न केले.

२०१२ मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी जालना ते खामगाव रेल्वे मार्गाचे संपूर्ण सर्वेक्षण करून अहवाल देण्याचे नमूद केले होते. त्यानुसार हे सर्वेक्षण झाले होते; परंतु सर्वेक्षण पथकाने हा मार्ग रेल्वेस प्रवासी, तसेच मालवातुकीसाठीदेखील आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याचा अहवाल रेल्वे बोर्डाला दिला होता. ही वस्तुस्थिती असताना या मार्गाचे नव्याने सर्वेक्षण करण्यासाठी रेल्वेच्या मुंबई येथील मध्य रेल्वे बांधकाम विभागाने पुढाकार घेत पाहणीसाठी एक पथक पाठविले आहे. या पथकातील सदस्य मंगळवारी जालन्यातील बाजार समिती, रेल्वे विभाग, उद्योग केंद्र, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, परिवहन विभागांशी संपर्क साधून वाहतुकीसंदर्भात माहिती जाणून घेऊन अहवाल तयार करणार आहेत.

जालना ते खामगाव रेल्वे मार्ग झाल्यास नागपूरसह पूर्वेकडील राज्यांना जालना जोडला जाणार आहे. त्याचा मोठा लाभ जालना येथील प्रवाशांसह मालवाहतुकीला होणार आहे. याच मार्गाप्रमाणे २०१२ मध्ये सोलापूर ते जळगाव हा रेल्वे मार्ग व्हावा म्हणूनही सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, त्यातही पुढे काहीच झालेले नाही.

प्रत्यक्ष भेटून सर्वेक्षण व्हावेजालना-खामगाव मार्गावर प्रवासी आणि मालवाहतुकीचे प्रमाण मोठे आहे. मध्य रेल्वेच्या वाहतूक सर्वेक्षण पथकाने जिल्ह्यातील जिल्हा उद्योग केंद्र, बाजार समिती, परिवहन महामंडळ, ट्रान्स्पोर्ट एजन्सी आदी यंत्रणांकडून याबाबतची वस्तुस्थिती प्रत्यक्ष भेटून जाणून घ्यावी. २०११ मध्ये केलेले सर्वेक्षण संबंधित यंत्रणांशी प्रत्यक्ष न भेटता परस्पर केले होते. त्यामुळे महसुलाचा परतावा उणेमध्ये दर्शविण्यात आला होता.- ॲड. डी. के. कुलकर्णी, सहसचिव रेल्वे संघर्ष समिती, जालना.

टॅग्स :Jalanaजालनाbuldhanaबुलडाणाrailwayरेल्वेtourismपर्यटन