शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

नवी एमआयडीसी होणार अडीच महिन्यांत सज्ज

By admin | Updated: January 6, 2017 23:51 IST

जालना मागील काही महिन्यांपासून येथील औद्योगिक वसाहत क्षेत्रात सुरू असलेल्या टप्पा क्रमांक ३ मधील जलकुंभ उभारणीचे काम पूर्ण झाले

गणेश कुलकर्णी  जालनामागील काही महिन्यांपासून येथील औद्योगिक वसाहत क्षेत्रात सुरू असलेल्या टप्पा क्रमांक ३ मधील जलकुंभ उभारणीचे काम पूर्ण झाले असून, रस्ते, नाल्या यासारखी कामेही निम्म्याहून अधिक प्रमाणात मार्गी लागली आहेत. त्यामुळे मार्च अखेरपर्यंत ही औद्योगिक वसाहत उद्योजकांसाठी सज्ज होणार असल्याचे चित्र आहे.जालना शहरानजीक औद्योगिक विकास महामंडळाच्या पूर्वीच्या दोनन एमआयडीसी आहेत. परंतु, उद्योजकांची वाढती संख्या लक्षात घेता महामंडळाने टप्पा क्र. १ व २ लगत तिसऱ्या टप्प्याचे कामही सुरू केले आहे. या एमआयडीसीमध्ये पाणीपुरवठ्याच्या अनुषंगाने १५०० क्युबिक लिटर साठवण क्षमतेची पाण्याची टाकी उभारली आहे. याच ठिकाणाहून नवीन एमआयडीसीतील उद्योजकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. यासाठी या परिसरात ७.८० कि.मी.लांबीची जलवाहिनी टाकण्यात येत असून, यासाठीचे पाईप येवून पडले आहेत. खोदकाम करून पाईप बसविण्याचे कामही सध्या प्रगतीपथावर असल्याचे दिसून येते. या भागात वीज पुरवठ्याच्या अनुषंगानेही जवळपास तीनशे पोल उभारले जाणार आहेत. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया संबंधित विभागाकडून पूर्व करण्यात आली आहे. याचे केवळ कार्यारंभ आदेश बाकी असून, ते मिळताच हे काम देखील सुरू होणार आहे. याशिवाय परिसरात ७.६८ किमी लांबीचे रस्ते तयार करण्यात येत आहेत. यातील मुख्य रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, अंतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे सुमारे २८ कोटी रुपये खर्चाची असून, अडीच महिन्यांत पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.