शेतकऱ्यांच्या वाढीव मावेजाकडे दुर्लक्ष; जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 14:47 IST2020-02-13T14:44:33+5:302020-02-13T14:47:39+5:30
न्यायालयातर्फे येथील संगणक व इतर साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या वाढीव मावेजाकडे दुर्लक्ष; जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची नामुष्की
जालना : जमीन संपादनाचा वाढीव मावेजा देण्याचे आदेश न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागासह इतर विभागावर जप्तीची नामुष्की ओढवली आहे. गुरुवारी दुपारी न्यायालयातर्फे येथील संगणक व इतर साहित्य जप्तीची कारवाई करण्यात आली.
मंठा तालुक्यातील जयपूर येथील शेतकऱ्याच्या जमीन संपादनाचा वाढीव मावेजा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशकडे दुर्लक्ष करणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागासह इतर विभागातील संगणक व इतर साहित्य जप्तीची कारवाई गुरुवारी करण्यात आली. न्यायालायाचे बिलिफ सुंदर्डे, शेटे, गडापप्पा यांच्यासह शेतकऱ्याचे वकील विजय घुले, गजानन पाटील आदींची उपस्थिती होती.