शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

युवकांना व्यसनाच्या जोखडातून बाहेर काढण्याची गरज : बल्लाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:33 IST

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील श्री गुरुदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात शनिवारी १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना ...

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील श्री गुरुदेव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर येथे आयोजित कार्यक्रमात शनिवारी १०वी व १२वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक जे. आर. पुनवटकर, पोलीस कर्मचारी महेश तोटे, गजानन अवचार, पर्यवेक्षिका जे. डब्ल्यू. दांडगे, जे. आर. गावडे, ए. एम. साळुंखे, प्रदीप थोरात, कीर्तिनंद गांगुर्डे, हरी गावडे आदींची उपस्थिती होती.

बल्लाळ म्हणाले की, शालेय जीवनात विद्यार्थ्यांना विविध गोष्टींचे आकर्षण असते. मुलींना कोणी त्रास देत असेल तर त्यांनी याद राखा. मुलींनी शिक्षण घेताना कोणत्याही प्रकारची भीती वाटू देऊ नये. तसा काही त्रास झाला तर त्याची तक्रार करावी. त्यानंतर त्या गुन्हेगारांवर पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. न्यायालयातसुद्धा फक्त मुलीचे व तिच्या पालकांचे म्हणणे ग्राह्य धरण्यात येते. कायदा हा मुलीच्या बाजूने आहे. त्यामुळे मुलींनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. विद्यार्थ्यांनी आपले लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित केले पाहिजे. अभ्यास करा अन् जीवनाचे राजे व्हा, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. जी. खांडेभराड यांनी केले. आर. व्ही. छल्लारे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. गणेश खटके, प्रा. विठ्ठल चव्हाण, रमेश दोंदल, अप्पासाहेब चव्हाण यांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे : पुनवटकर

मुख्याध्यापक जे. आर. पुनवटकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिकताना अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. एक ध्येय ठेवून काम करावे. पायाभूत विषयांची चांगली तयारी करा. यातून आपल्याला आयुष्यात यश मिळून मोठ्या पदावर जाता येते. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालायला पाहिजे. मुलींना त्रास देणाऱ्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई होते, असेही त्यांनी सांगितले.