समाजबांधवांनी एकत्र येण्याची गरज- रेणके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 00:38 IST2018-12-30T00:38:24+5:302018-12-30T00:38:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : जोशी, गोंधळी, वासुदेव या तिन्ही समाजांना आरक्षण हवे आहे. याकरिता तिन्ही समाज बांधवांनी एकत्र ...

समाजबांधवांनी एकत्र येण्याची गरज- रेणके
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जोशी, गोंधळी, वासुदेव या तिन्ही समाजांना आरक्षण हवे आहे. याकरिता तिन्ही समाज बांधवांनी एकत्र यावे, असे आवाहन जोगोवा सेवा समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माणिक रेणके यांनी केले.
जाफराबाद तालुक्यातील खासगाव येथे जोगोवा सेवा समितीच्या वतीने मेळावा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. रेणके म्हणाले की, प्रत्येक समाजाला आरक्षण आहे. मात्र. आजही आपल्या समाजाला अडीच टक्केच आरक्षण असून त्या मध्येही ५२ जातीचा समावेश केलेला आहे. नुकतेच मराठा समाजाला शासनाने १६ टक्के आरक्षण दिले आहे. जोशी, गोंधळी, वासुदेव समाजाला जास्तीच आरक्षण मिळाले पाहिजेत. त्याकरिता तिनही समाज बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रा.आसाराम बोटुळे, डॉ. श्यामसुंदर सोनवणे, तातेराव शिंदे, भारत शिंदे, अंबादास काळे, केशव मोहरकर, एल. बी.चव्हाण यांची उपस्थिती होती.