टेंभुर्णीत चोरट्यांचा देशी दारूवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:11 IST2019-04-11T00:11:30+5:302019-04-11T00:11:44+5:30
टेंभुर्णीत चोरट्यांनी थेट देशी दारू दुकानालाच आपले लक्ष्य बनवित २ लाखाची दारू चोरली

टेंभुर्णीत चोरट्यांचा देशी दारूवर डल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : एकीकडे निवडणूक प्रचाराची रणधुमाळी चालू असताना टेंभुर्णीत चोरट्यांनी थेट देशी दारू दुकानालाच आपले लक्ष्य बनवित २ लाखाची दारू चोरली आहे. ही घटना बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली.
येथील आंबेगाव रोडवर शासन मान्य देशी दारुचे दुकान आहे. बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत हे दुकान फोडले. यात २ लाख ३ हजार ५०० रू. किंमतीचे देशीदारुचे ९५ बॉक्स व तिजोरीतील १७ हजार रुपयांची रोकड असा २ लाख २० हजार ५०० रुपयांचा माल घेऊन चोरटे फरार झाले. सकाळी दुकानात गेल्यानंतर मालकाला ही घटना समजली.
दरम्यान, प्रदीप जैस्वाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास सपोनि सुदाम भागवत करीत आहेत.