रेल्वेरुळाजवळ माय-लेकराचे मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 00:26 IST2019-09-20T00:25:19+5:302019-09-20T00:26:02+5:30
जालना तालुक्यातील मंमदाबाद गावच्या शिवारातील रेल्वे रुळाजवळ एका महिलेसह तिच्या दीड वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला.

रेल्वेरुळाजवळ माय-लेकराचे मृतदेह
लोकमत न्यूज नेटवर्क
रांजणी : जालना तालुक्यातील मंमदाबाद गावच्या शिवारातील रेल्वे रुळाजवळ एका महिलेसह तिच्या दीड वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आला. ही घटना गुरूवारी सकाळी समोर आली असून, या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविता श्रीहरी इगारे (२८) व अभिजित (दीड वर्षे रा. करडगाव ता. घनसावंगी) अशी मयतांची नावे आहेत. करडगाव येथील विवाहिता सविता इगारे या दीड वर्षाचा अभिजित याला घेऊन बुधवारी रात्री घरातून निघून गेल्या होत्या.
नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता गुरूवारी सकाळी मंमदाबाद (ता.जालना) शिवारातील रेल्वे रुळाजवळ त्या दोघांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच मौजपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
मयतांच्या पार्थिवाचे जालना जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. याबाबत आत्माराम इगारे यांनी दिलेल्या माहितीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोहेकॉ जायभाय हे करीत आहेत.