‘त्या’ युवतीचा खून; एकाविरूध्द गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 00:41 IST2019-12-24T00:41:16+5:302019-12-24T00:41:55+5:30

शहरातील म्हाडा कॉलनी भागातील रेल्वे पटरीजवळ शनिवारी रात्री एका युवतीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात एका संशयित युवकाविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Murder of 'that' young woman; Filed against one | ‘त्या’ युवतीचा खून; एकाविरूध्द गुन्हा दाखल

‘त्या’ युवतीचा खून; एकाविरूध्द गुन्हा दाखल

जालना : शहरातील म्हाडा कॉलनी भागातील रेल्वे पटरीजवळ शनिवारी रात्री एका युवतीचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात एका संशयित युवकाविरूध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना शहरातील म्हाडा कॉलनी भागातील रेल्वे पटरीजवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास दीपाली रमेश शेंडगे (२२) या युवतीचा मृतदेह आढळून आला होता. मात्र, दीपालीचा खून झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता. नातेवाईकांची आक्रमक भूमिका पाहता पोलिसांनी खूनचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले हाते. त्यानंतर मयत मुलीचे पार्थिव ताब्यात घेऊन नातेवाईकांनी अंत्यविधी केला. या प्रकरणात परतूर येथील संशयित अविनाश वंजारे चंदनझिरा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच या प्रकरणातील इतर अनेक बाबी समोर येण्याची शक्यता आहे, असे चंदनझिरा पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Murder of 'that' young woman; Filed against one