‘त्या’ युवकाची आत्महत्या की खून ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:55 IST2018-07-18T00:55:02+5:302018-07-18T00:55:22+5:30
अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरातील रामकाटा वस्तीजवळ गट क्रमांक ६२२ शिवारात युवकाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती.

‘त्या’ युवकाची आत्महत्या की खून ?
लोकमत न्यूज नेटवर्क
रोहिलागड/अंबड : अंबड तालुक्यातील रोहिलागड परिसरातील रामकाटा वस्तीजवळ गट क्रमांक ६२२ शिवारात युवकाने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती.
कैलास दिलीप चंदनशिव वय (२०) असे मृत युवकाचे नाव असून सदर आत्महत्या नेमकी कुठल्या करणाने केली हे २४ तास उलटल्यावरही पुढे आले नाही. ही कैलास चंदनशिव याची आत्महत्या आहे, की त्याचा खून करून त्याला फासावर लटकवले; या बाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या प्रकरणात पोलिसांनी संशयित म्हणून उत्तम वैद्य, लक्ष्मण वैद्यसह आणखी दोन महिला अशा एकूण चार जणांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबड येथील शासकीय रूग्णालयात सोमवारीच रात्री हलवण्यात आला होता. परंतु जोपर्यंत मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करून घेतला जात नाही, तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन होऊ देणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली.त्यामुळे इनकॅमेरा शवविच्छेदनासाठी मृतदेह औरंगाबाद येथे हलविण्यात आला. असल्याचे पोलिस उपविभागीय अधिकारी सी.डी. शेवगण, पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, पोलीस जमादार के.बी.दाभाडे यांनी सांगितले. यावेळी पोलीसांनी ज्या ठिकाणी आत्महत्या झाली, तेथे काही संशयास्पद सापडते का याची पाहणी केल्याचे सांगण्यात आले .