धोंड्याच्या महिन्यातच जावयाचा खून; बापासह भावांनीच पुसले बहिणीचे कुंकू

By दिपक ढोले  | Updated: August 11, 2023 17:57 IST2023-08-11T17:56:00+5:302023-08-11T17:57:15+5:30

जावयाचा खून करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Murder of son-in-law in the month of Dhonda; Brothers along with father kills sister's husband | धोंड्याच्या महिन्यातच जावयाचा खून; बापासह भावांनीच पुसले बहिणीचे कुंकू

धोंड्याच्या महिन्यातच जावयाचा खून; बापासह भावांनीच पुसले बहिणीचे कुंकू

परतूर : शेतातील पाण्याच्या वादातून सासऱ्यासह मेहुण्यांनी जावयाचा खोऱ्याच्या दांड्याने मारहाण करून खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी परतूर शहरात घडली. धोंड्याच्या महिन्यातच बापासह भावांनीच बहिणीचे कुंकू पुसल्याने खळबळ उडाली आहे. कृष्णा धोंगडे (४०) असे मृताचे नाव आहे.

परतूर येथील कृष्णा धोंगडे यांची सेलू रोडवर औषधाची दुकान आहे. धोंगडे व त्यांचे सासरे संशयित नरहरी रोकडे, मेहुणा पांडुरंग रोकडे, पवन रोकडे यांच्यात शेतातील पाण्याचा वाद सुरू होता. त्याचा राग मनात धरून ८ ऑगस्टच्या रात्री १० वाजता कृष्णा धोंगडे हे मेडिकल बंद करून घराकडे जात होते. साईबाबा मंदिराजवळ संशयित सासरे नरहरी रोकडे, मेहुणा पांडुरंग रोकडे, पवन रोकडे व शंकर पतंगे यांनी कृष्णाला अडवून खोऱ्याच्या दांड्याने मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना आधी परतूर, जालना आणि नंतर छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी सागर गुणाजी धोंगडे यांच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसांत चौघांना जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मयत कृष्णा धोंडगे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक केंद्रे हे करीत आहेत.

Web Title: Murder of son-in-law in the month of Dhonda; Brothers along with father kills sister's husband