मराठा आरक्षण ही भीक नव्हे प्रतिनिधीत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 00:52 IST2018-11-18T00:52:11+5:302018-11-18T00:52:18+5:30
आरक्षण मागणे म्हणजे भीक मागणे हे समजणे चुकीचे त्या जातीचे प्रतिनिधित्व नोकरी, व्यवसायात असण्यासाठी वंचित समाजाला आरक्षण मिळलेच पाहिजे असे प्रतिपादन पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शनिवारी सायंकाळी येथील मराठा फाऊंडेशनच्या दुष्काळ आणि आरक्षण परिषदेत बोलताना केले.

मराठा आरक्षण ही भीक नव्हे प्रतिनिधीत्व
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आरक्षण मागणे म्हणजे भीक मागणे हे समजणे चुकीचे त्या जातीचे प्रतिनिधित्व नोकरी, व्यवसायात असण्यासाठी वंचित समाजाला आरक्षण मिळलेच पाहिजे असे प्रतिपादन पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शनिवारी सायंकाळी येथील मराठा फाऊंडेशनच्या दुष्काळ आणि आरक्षण परिषदेत बोलताना केले.
हार्दिक पटेल यांनी केंद्र आणि राज्यातील युती सरकारवर तोफ डागली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना त्यावर ठोस असे उपाय न करता केवळ दुष्काळी जाहीर करून सरकार आपली जबाबदारी झटकत आहे. दुष्काळात करावयाच्या उपायोजना केवळ कागदावरच असल्याचे पटेल म्हणाले. समाजातील लोकांनी चुकीच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिल्याने आता त्यांच्यावर नाराज होऊन चालणार नाही. भविष्यात याकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी पटेल यांनी जगण्यासाठी मोबाईलची गरज नाही, परंतु पोटाला पुरसे अन्न आवश्यक आहे. मात्र सध्या सरकार याकडे लक्ष देण्याएैवजी अंबानी-अदानी या उद्योगपतींचे भले कसे होईल अशाच योजना राबवित असल्याचाआरोपही केला.
केंद्र सरकार शेतकºयांच्या आत्महत्येची खरी आकडेवारी समोर येऊ देत नाही. गुजरातमध्ये एक हजार ३०० शेतकºयांनी आत्महत्या केल्या असून, महाराष्ट्रात पाच हजार शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र सरकार हे क्रिकेटच्या मॅच सारखे हा आकडेवारीचा खेळ करून आमच्या काळात एवढ्या कमी आत्महत्या झाल्या हे भासवित आहे. हे सरकारचे धोरण चुकीचे असल्याचेही यावेळी ते म्हणाले. सरकारला जाब विचारण्याची ताकद ठेवली पाहिजे तरच आपले प्रश्न सुटतील असे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षणा संदर्भातील अहवाल सादर झाला असून, त्यावर सकारात्मक निर्णय होऊन मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रास्ताविक संयोजक अविनाश कव्हळे यांनी केले.