उपोषणस्थळी येऊ नये, लढण्यासाठी मी खंबीर, मनोज जरांगे पाटील यांचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 05:43 IST2024-06-10T05:43:01+5:302024-06-10T05:43:55+5:30
Maratha Reservation: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा रविवारी दुसरा दिवस होता. सरकारकडून कुणीही भेटायला आलेले नाही.

उपोषणस्थळी येऊ नये, लढण्यासाठी मी खंबीर, मनोज जरांगे पाटील यांचं आवाहन
वडीगोद्री (जि. जालना) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा रविवारी दुसरा दिवस होता. सरकारकडून कुणीही भेटायला आलेले नाही. निवडणूक निकालानंतर कुणाचेही आक्षेपार्ह स्टेटस ठेवू नका, असे आवाहन त्यांनी केले. अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी येऊ नये, लढण्यासाठी मी खंबीर असल्याचेही मनोज जरांगे म्हणाले.