Maratha Kranti Morcha : जालन्यात आंदोलकांनी काढाला तिरडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 20:00 IST2018-07-24T19:59:44+5:302018-07-24T20:00:32+5:30
आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्री, आमदार आणि खासदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत 'तिरडी मोर्चा' काढण्यात आला.

Maratha Kranti Morcha : जालन्यात आंदोलकांनी काढाला तिरडी मोर्चा
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद जालन्यात देखील उमटले आहेत. आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्री, आमदार आणि खासदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत 'तिरडी मोर्चा' काढण्यात आला.
आज सकाळी शहरातील शिवाजी महाराज पुतळा येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा तिरडी मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात मोठ्यासंख्येने मराठा समाजबांधव सामील झाले होते. मोर्चा दरम्यान शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.