जरांगेंना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा, मात्र संविधानाला कोणीच ठेच पोहचू शकत नाही: लक्ष्मण हाके
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 18:42 IST2024-06-21T18:33:07+5:302024-06-21T18:42:38+5:30
- पवन पवार वडीगोद्री ( जालना ) : मिस्टर मनोज जरांगे तुम्हाला आरक्षणातले शून्य नॉलेज आहे, तुमची माझ्या समोर बोलायची ...

जरांगेंना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा, मात्र संविधानाला कोणीच ठेच पोहचू शकत नाही: लक्ष्मण हाके
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : मिस्टर मनोज जरांगे तुम्हाला आरक्षणातले शून्य नॉलेज आहे, तुमची माझ्या समोर बोलायची लायकी नाही. जरा अभ्यास करा, सल्लागारांकडून माहिती घ्या. आरक्षण कळण्या एवढी जरांगे यांची उंची नाही, अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके मनोज जरांगेचा समाचार घेतला. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात बेमुदत उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे.
हाके यांचे जरांगे यांना चर्चेचे आव्हान
ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुढे म्हणाले, गेली सात आठ महिने आम्ही शांत बसलो. जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं. टारगेट करून ओबीसी नेते बदनाम केले. त्यांची घरे, हॉटेल जाळली. लोकशाहीमध्ये मोठ्या मोठ्या लोकांची इथल्या जनतेने जिरवलेली आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी यंत्रणा ताब्यात घेणार का? तुम्ही मुख्यमंत्री व्हा तुम्हाला शुभेच्छा आहेत, मात्र संविधानाला ठेस कुठलाच सम्राट पोहोचू शकत नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला तयार आहे, असे आव्हान हाके यांनी जरांगेना दिले.
नक्की कोण जातीवादी?
ओबीसी यांनी ७० वर्ष आरक्षण खाण्याच प्रश्न येतोच कुठे? मंडल आयोग १९९३ ला लागू झाला. ओबीसीने रिझर्वेशन खाल्ल असतं तर ओबीसीचे ४०० कारखाने ओबीसींचे दिसले असते. भुजबळांची राजकीय कारकीर्द उध्वस्त करायला जनता तयार आहे ना, तू कोण राजकीय कारकीर्द उध्वस्त करणारा ? असा इशारा हाके यांनी दिला. तसेच छगन भुजबळ, प्रकाश शेंडगे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, मुंडे बहिण बंधू, विजय वडेट्टीवार आम्ही सर्वजण महाराष्ट्रातल्या ४९२ जातींसाठी बोलतो. पण जरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलताय मग नक्की जातीय वादी कोण? असा सवालही हाके यांनी केला.
आपला कोण, परका कोण ठरवा
तुम्हाला मुसलमानांची मते चालली, मात्र तुम्हाला जलील चालले नाही. तुम्हाला दलितांची मते चालली. मात्र तुम्हाला आनंदराज आंबेडकर, बाळासाहेब आंबेडकर चालले नाहीत. आपण सर्व दलित, मुस्लिम, एसटी, ओबीसी एकत्रित या. आपला कोण, परका कोण याचा नक्कीच विचार करूया. शेतकऱ्यांची चळवळ जोशींनी लढली, शेट्टीने लढली, तुम्ही कायम सत्तेत राहिला. तुम्ही निवडणुका जिंकल्यानंतर तंत्रज्ञान आत्मसात केलं. मात्र आमच्या ओबीसींची भावना आणि वेदना इथल्या सत्ताधाऱ्यांना कधीही समजली नाही. आम्ही ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करत आहोत. विचाराने विचारांची लढाई लढली जाऊ शकते असेही हाके म्हणाले.