फरार कोरटकर फडणवीस सरकारचा सोयरा, मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 13:27 IST2025-03-22T13:26:06+5:302025-03-22T13:27:22+5:30

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्यातील मराठा सेवकांची बैठक पैठण फाटा छत्रपती भवन येथे बोलवली.

manoj jarange patil slams devendra fadnavis Over Koratkar | फरार कोरटकर फडणवीस सरकारचा सोयरा, मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

फरार कोरटकर फडणवीस सरकारचा सोयरा, मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

पवन पवार 

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा फरार कोरटकर फडणवीस सरकारचा सोयरा आहे. त्याच्यामुळे तो सापडत नाही हे पोलिसांचं अपयश नाही. देवेंद्र फडणवीस हे घडवून आणत आहे. अपमान करणारे सगळे त्यांचे सोयरे आहेत असा हल्लाबोल मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि राज्यातील मराठा सेवकांची बैठक पैठण फाटा छत्रपती भवन येथे बोलवली. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जेवढ्या मकोकासारख्या कलमा आहेत तेवढ्या कलमा त्याच्यावर टाकल्या पाहिजे. तुमचं खरंच छत्रपतींवर प्रेम आहे, हिंदूतले काही जण रोज छत्रपतींचा अवमान करत आहे. यांनी फक्त आमचा वापर भांडण्यासाठी केला आणि यांनी यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या अशी टीका सरकारवर केली.

क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस , नुसता वापर केला माझ्या समाजाचा. तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही, आणि ते नकोही, आम्हाला छत्रपतींचा हिंदुत्व मान्य आहे. आता फक्त निषेध करून चालणार नाही. महापुरुषांवर बोलणाऱ्यांना धडा शिकवावा लागेल. मराठा समाज आला, राज्यभरातला आला, लोकांच्या अडीअडचणी जाणून घ्यायला प्रत्येक गावात एक माणूस असला पाहिजे. समाजातील लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी सेवकांची निवड केली आहे. समाजातील नागरिकांना अडीअडचणी आल्या तर सांगायच्या कोणाला असे जरांगे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी एक टोळी तयार केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महापुरुषांचा ते अपमान करतात. ते फक्त दाखवायला हिंदू दाखवतात आणि रोज घाणेरड्या शब्दात बोलतात. तेव्हाच कळतं की यांचा पाठीराखा कोण. यांना बळ कोण देतं. यानंतर देवेंद्र फडणवीस दाटून मुटून बोलणार देवेंद्र फडणवीस. फक्त गोरगरिबाचे लेकरं गुतू शकतो, त्यांचे वाटोळ करू शकतो... त्याने काही जण फक्त जाणून-बुजून अवमान करण्यासाठी ठेवले आहेत. आत्ता आम्हाला कळलं की, मागील सत्तर वर्ष त्यांनी वापर फक्त आमचा भांडणासाठीच केला आहे. आम्ही जर हिंदू आहे तर आम्हाला मोठं कधी करणार आहे. हिंदू हिंदू म्हणून आमचा घात किती दिवस करायचा आहे. धर्माचे रक्षण करणारी जात आहे मराठा, तुम्ही तिला संपवायला लागलात असा टोला जरांगे यांनी फडणवीस यांना लगावला.

Web Title: manoj jarange patil slams devendra fadnavis Over Koratkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.